शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धु वा धा र...

By admin | Updated: June 17, 2015 02:47 IST

मान्सून मागील दोन दिवसांपासून विदर्भात चांगलाच सक्रिय झाला आहे. मंगळवारी पावसाने उपराजधानीत धुंवाधार हजेरी

नागपूर: मान्सून मागील दोन दिवसांपासून विदर्भात चांगलाच सक्रिय झाला आहे. मंगळवारी पावसाने उपराजधानीत धुंवाधार हजेरी लावली. दुपारी साधारण ३.३० वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. तब्बल एक तास तो धो-धो बरसला. यानुसार सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत एकूण ३.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय सोमवारी ५.२ मिमी पाऊस कोसळला होता. हवामान विभागाने १६ जूनपासून विदर्भात मान्सूनचा जोर वाढेल, असा यापूर्वीच अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार मागील तीन दिवसांपासून वातावरण तयार होऊ लागले आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजतापर्यंत चांगले ऊन तापले. परंतु ३.३० वाजता दरम्यान अचानक आकाशात ढगांची गर्दी झाली, आणि काहीच वेळात विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाला सुरुवात झाली. तो सायंकाळी ४.३० वाजतापर्यंत सुरू होता. यानंतर पावसाचा जोर कमी झाला. या धो-धो पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. (सविस्तर पान २ वर)वीज पडून मुलीचा मृत्यू मंगळवारी तकिया धंतोली परिसरातील एका दहा वर्षाच्या मुलीच्या अंगावर वीज पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. पायल मधुकर मऱ्हसकोल्हे असे तिचे नाव आहे. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. पायल ही सुळे हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिकत होती. मंगळवारी दुपारी ती आपल्या इतर चार-पाच मैत्रिणींसह घरापुढे खेळत होती. दरम्यान तिथे अचानक वीज कोसळली. यात पायलचा मृत्यू झाला.