शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मुस्कानच्या चेहऱ्यावरील हास्य हरविले !

By admin | Updated: June 25, 2015 03:04 IST

मोमीनपुऱ्यात राहणाऱ्या १२ वर्षांच्या मुस्कानच्या पोटाला गंभीर दुखापत होऊन तिला ‘क्रोनिक कॅलसिफीक पॅक्रिटीटीस’ हा आजार जडला.

नागपूर : मोमीनपुऱ्यात राहणाऱ्या १२ वर्षांच्या मुस्कानच्या पोटाला गंभीर दुखापत होऊन तिला ‘क्रोनिक कॅलसिफीक पॅक्रिटीटीस’ हा आजार जडला. आजीने घर घेण्यासाठी गोळा केलेले नऊ लाख रुपये तिच्या उपचारावर खर्च केले. परंतु मागील १५ दिवसांपासून पैशांअभावी मुस्कानची औषधी बंद आहे. हैदराबादला उपचारासाठी कसे न्यावे हा चिंतातुर करणारा प्रश्न तिच्या आाजीला भेडसावत आहे. त्यामुळे मुस्कानच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी गरज आहे ती समाजातील दानदात्यांनी सढळ हाताने मदत करण्याची.मुस्कान खान ही आपली आजी सलमा वारसी (५५), आई मुमताज परवीन खान आणि भावासोबत आजीकडे जामा मशीद जल्काउद्दीन चिल्ला मोमीनपुरा येथे राहते. मुस्कानच्या वडिलांनी त्यांना सोडून दिले अहे. नालसाहब चौक खदान येथील ब्ल्यू डायमंड इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकत असताना २ मे २०१२ रोजी दुचाकीच्या चाकात दुपट्टा गेल्यामुळे मुस्कानचा अपघात होऊन तिच्या पोटाला गंभीर इजा झाली. मुस्कानची आजी सलमा वारसीने तिच्या उपचारावर नागपुरातील रुग्णालयात नऊ लाख रुपये खर्च केले. हैदराबादला जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यावर तेथेही उपचारापोटी तीन ते चार लाख खर्च झाले. घर घेण्यासाठी गोळा केलेले सर्व पैसे खर्च झाले. सध्या मुस्कानच्या आजीजवळ तिच्या उपचारासाठी एकही पैसा नसल्यामुळे आणि घरात ती एकटीच कमावती असल्यामुळे ती हतबल झाली आहे. मुस्कानच्या उपचारासाठी आणखी १० लाखाचा खर्च अपेक्षित आहे. पैसे नसल्यामुळे मागील १५ दिवसांपासून मुस्कानची औषधीही बंद झाली आहे. त्यामुळे मुस्कानला या आजारातून बाहेर काढण्यासाठी आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी समाजातील दानदात्यांनी सढळ हाताने मदत करण्याची गरज आहे. त्यासाठी मुमताज परवीन खान यांच्या स्टेट बँक आॅफ इंडिया सेंट्रल एव्हेन्यू खाते क्रमांक २०२८३९७६०९१ मध्ये समाजातील दानशूर व्यक्ती, समाजसेवी संस्थांनी मदत करण्याचे कळकळीचे आवाहन मुस्कानची आजी सलमा वारसी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)