शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

लघु उद्योजकांनो, येणारा काळ तुमचाच!

By admin | Updated: August 23, 2015 03:00 IST

आपल्या देशाच्या विकासात लघु उद्योगांनी मौलिक योगदान दिले आहे. येणारा काळ हा लघु उद्योगांचाच असून यातूनच देश महासत्ता होईल.

देवेंद्र फडणवीस : लघु उद्योग भारतीच्या राष्ट्रीय परिषदेची सुरुवातनागपूर : आपल्या देशाच्या विकासात लघु उद्योगांनी मौलिक योगदान दिले आहे. येणारा काळ हा लघु उद्योगांचाच असून यातूनच देश महासत्ता होईल. समोरील मोठ्या संधी लक्षात घेऊन युवाशक्तीच्या कौशल्य विकासावर गुंतवणूक व्हावी, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. लघु उद्योग भारतीतर्फे रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात लघु व मध्यम उद्योजकांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेदरम्यान ते बोलत होते.यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्रा, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अर्थतज्ज्ञ बजरंगीलाल गुप्ता हे प्रामुख्याने उपस्थित होते. देशात सर्वात जास्त रोजगारांची निर्मिती ही लघु उद्योगातूनच होते. देशात उद्योगक्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय २०२० साली भारत हा देशातील सर्वात तरुण देश असेल. त्यामुळे लघु उद्योगांसाठीदेखील अनेक संधी आहेत. ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न प्रत्यक्षात आणताना युवाशक्तीला कुशल मनुष्यबळात परावर्तित करण्याची गरज आहे. यातूनच सशक्त अर्थव्यवस्था निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. देशाच्या आर्थिक स्थितीसमोर आव्हाने असतानादेखील आज स्थिती बदलते आहे. उद्योगजगताच्या विकासासाठी देशात चांगली वाहतूक व्यवस्था व रस्ते असणे आवश्यक आहे. लघु उद्योगांचे महत्त्व लक्षात घेता विविध सुविधा वाढविण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे लघु उद्योजकांसाठी व्याजदरात कपात व्हायला हवी, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. उत्पादन शुल्क कमी करून दर्जा वाढविण्याची क्षमता लघु उद्योगांमध्येच आहे, असेदेखील ते म्हणाले. राज्यातील लघु उद्योगांना लागणारी वीज कमी दरात उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच विदर्भ-मराठवाड्याशी संबंधित ‘क्रॉस-सबसिडी’ हटविण्याचा निर्णय हिवाळी अधिवेशनापर्यंत घेण्यात येईल, असे सांगत विजेचे दर वाढणार नाहीत, असे आश्वासन त्यांनी दिले. राज्यात मोठे उद्योग आणणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. एक मोठा उद्योग आला की लहान उद्योगदेखील सुरू होतात.उद्योग सुरू करण्यासाठी आता ७६ ऐवजी केवळ २५ परवानग्या घ्याव्या लागतात.लघु उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांचा उपयोग करायला हवा, असा सल्ला सुभाष देसाई यांनी दिला. या परिषदेला देशभरातून ६७२ प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत. यावेळी आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, लघुभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष एच.व्ही.एस.एस.कृष्णा, राष्ट्रीय सचिव ओमप्रकाश मित्तल, भूषण वैद्य, शरद बागची, हेमंत अंबासेलकर प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)नेहरूंमुळे देशातील गरिबी वाढलीदेशातील गरिबी वाढण्यासाठी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे, अशी टीका यावेळी नितीन गडकरी यांनी केली. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारने अर्थव्यवस्थेचे ‘लेफ्टिस्ट मॉडेल’ स्वीकारले. यामुळे उद्योगांचा विकास झालाच नाही व परिणामी देशात गरिबीचे प्रमाण वाढले. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या ‘मॉडेल’वर सर्व राजकीय मतभेद विसरून विचार होणे आवश्यक असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले.विदर्भाच्या विकासासाठी पाच ‘क्लस्टर’केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांनी लघुउद्योगांच्या विकासात तंत्रज्ञानाच्या भूमिकेचे महत्त्व विषद केले. लघुउद्योगांना चालना देऊन त्यांच्या विस्ताराची आवश्यकता आहे. विदर्भात तर उद्योग क्षेत्राच्या विकासाला प्रचंड वाव आहे. हीच बाब लक्षात घेऊन येथे पाच ‘क्लस्टर’ विकसित करण्यात येत आहे. यात दालमिल क्लस्टर, आॅटो इंजिनिअरींग क्लस्टर, गारमेन्ट क्लस्टर, फ्लाय अ‍ॅश क्लस्टर व राईस मिल क्लस्टर यांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.लघु उद्योगांमुळेच टिकली देशाची अर्थव्यवस्थादेशाच्या अर्थव्यवस्थेत लघु उद्योगांचे मोठे महत्त्व आहे. देशाची अर्थव्यवस्था अनेक संकटे झेलूनदेखील केवळ यामुळेच टिकली आहे. स्वदेशी, स्वावलंबी व विकेंद्रित अर्थतंत्रातूनच विकास शक्य आहे. लघु उद्योगांकडे पाहण्याची दृष्टी बदलायला हवी, असे मत बजरंगीलाल गुप्ता यांनी व्यक्त केले.