शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

स्मार्टफोनने उडवली झोप : राजेश स्वर्णकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 22:18 IST

झोपण्यापूर्वी लॅपटॉप, टॅब्लेट्स, स्मार्टफोन व ई-बुकचा वापर वाढला आहे. परिणामी, जगात ४५ टक्के लोकांना झोपेशी जुळलेल्या रोगाशी सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देमानसिक आजारासह मधुमेह, रक्तदाबाचा धोकाझोपेच्या विकारावर उद्यापासून परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झोपण्यापूर्वी लॅपटॉप, टॅब्लेट्स, स्मार्टफोन व ई-बुकचा वापर वाढला आहे. परिणामी, जगात ४५ टक्के लोकांना झोपेशी जुळलेल्या रोगाशी सामना करावा लागत आहे. चांगल्या आरोग्यासाठी झोप महत्त्वाची आहे. पुरेशी झाोप झााल्यास मानसिक आजारासह मधुमेह, रक्तदाबासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी करता येऊ शकतो, अशी माहिती पल्मोनोलॉजिस्ट डॉ. राजेश स्वर्णकार यांनी पत्रपरिषदेत दिली.चिटणवीस सेंटर येथे १२ ऑक्टोबरपासून अपुरी झोप आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची कारणमीमांसा करण्यासाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हे निमित्त साधून डॉ. स्वर्णकार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी इंटरव्हेन्शनल पल्मोनोलॉजिस्ट डॉ. दीपक मुथरेजा व ज्येष्ठ पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अनिल सोनटक्के उपस्थित होते. डॉ. स्वर्णकार म्हणाले, प्रौढांसाठी सात ते आठ तासापर्यंतची झोप पुरेशी आहे. त्यानंतर जबरदस्ती झोपण्याचा प्रयत्न करू नये. जेवणानंतर कॅफिनयुक्त पेय घेऊ नये. झोपण्यापूर्वी दारूचे सेवन करू नये. सायंकाळनंतर धूम्रपान किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या निकोटिनचे सेवन करू नये. भारतात रस्ता अपघातासाठी निद्रानाश हेही एक कारण आहे.परिषदेचे आयोजन सचिव डॉ. स्वर्णकार म्हणाले, दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत झोप आणि सकारात्मकता यावर डॉ. दीपक मुथरेजा माहिती देणार आहेत. झोपेमुळे होणाऱ्या दुष्परिणामावर ऑस्ट्रेलिया येथील डॉ. डेव्हिड कनिंग्टन, डॉ. केव्हिन काप्लान व्याख्यान देतील. अपुरी तसेच झोपेत वारंवार खंड पडल्याने होणाºया विविध प्रकारच्या व्याधींवर डॉ. हिमांशु गर्ग व डॉ. प्रतिभा डोग्रा मार्गदर्शन करतील. याशिवाय अमेरिका, लंडन, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया व श्रीलंका या देशातील स्लीप मेडिसीन या विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत.अपूऱ्या झोपेमुळे मानसिक व्याधीडॉ. स्वर्णकार म्हणाले, अपूर्ण किंवा कमी दर्जाच्या झोपेमुळे शारीरिक व मानसिक व्याधी जडतात़ ‘स्लिप अ‍ॅपनिया’ नावाचा आजार जागतिक स्तरावर ४ टक्के वयस्क व्यक्तींमध्ये आढळतो़ त्याचप्रमाणे झोपेचा ‘रेस्टलेस लेग सिंड्रोम’ नावाचा आजार १० टक्के लोकांमध्ये आढळतो़ उशिरा झाोपणारे किंवा रात्रपाळीत काम करण्याऱ्या व्यक्तींमध्ये गंभींर स्वरूपाचे आजार होण्याची शक्यता अधिक असते. रात्री झोपेत घोरणे हा ‘स्लिप अ‍ॅपनिया’ या गंभीर आजाराचे लक्षण आहे. यामुळे झाोपेच्या ‘सायकलमध्ये’ अडथळा निर्माण होऊन शारीरिक व मानसीक स्वरूपाचे गंभीर आजार होतात.

 

टॅग्स :Mobileमोबाइलdoctorडॉक्टर