शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्याची हमी, ‘पॉलिटेक्निक’कडे ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यंदा दहावीचा निकाल बंपर लागल्याने विविध अभ्यासक्रमांमध्ये गर्दी दिसून येत आहे. कौशल्यविकासाचे महत्त्व वाढल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : यंदा दहावीचा निकाल बंपर लागल्याने विविध अभ्यासक्रमांमध्ये गर्दी दिसून येत आहे. कौशल्यविकासाचे महत्त्व वाढल्याने अनेक विद्यार्थी ‘पॉलिटेक्निक’कडे वळताना दिसून येत आहेत. रोजगाराची संधी मिळत असल्याने व सोबतच उच्च शिक्षणाची संधी कायम राहत असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. नागपूर विभागात १३ हजारांहून अधिक जागांसाठी ७ हजार ७१४ अर्जांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे यंदा रिक्त जागांचे प्रमाण घटण्याची चिन्हे आहेत.

मागील वर्षी सुमारे ४४ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. परंतु यंदा हा आकडा वाढणार असल्याचे निश्चित आहे. ‘पॉलिटेक्निक’साठी ऑनलाईन पर्याय नोंदविण्याची अंतिम मुदत १६ सप्टेंबर होती. शनिवारी पहिल्या फेरीचे अलॉटमेंट करण्यात आले. प्रवेशाच्या पहिल्या फेरीत विद्यार्थी २३ तारखेपर्यंत प्रवेश घेऊ शकतील. २४ ला रिक्त जागांची यादी तर २५ सप्टेंबरला त्यासाठी ऑप्शन भरता येईल. त्यानंतर ३० सप्टेंबरला जागांचे अलॉटमेंट करण्यात येईल. १ ऑक्टोबरपासून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे यंदा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत.

उद्योगक्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ

पारंपरिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत ‘पॉलिटेक्निक’च्या शिक्षणाचा खर्च कमी आहे. शिवाय अभियांत्रिकी पदवीच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेशाची संधी असते. औद्योगिक वसाहती व उद्योगांमध्ये कुशल मनुष्यबळाला मागणी आहे. सोबतच विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर स्वत:चा व्यवसायदेखील सुरू करतात. त्यामुळेच ‘पॉलिटेक्निक’कडे ओढा वाढला आहे.

कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकलकडे ओढा

कोरोनाकाळात ऑनलाईन व्यवहार व संगणकाशी निगडित उद्योगांचे महत्त्व वाढले आहे. भविष्याचा वेध घेत अनेक विद्यार्थ्यांनी संगणक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला प्राधान्य दिले आहे. त्यापाठोपाठ मेकॅनिकल, सिव्हील आदी अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले जात आहे.

पॉलिटेक्निकमधून कौशल्याधिष्ठित बनण्याची संधी

पॉलिटेक्निकमधील तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कौशल्याधिष्ठित होण्यासोबतच रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतात. गेल्यावर्षीच्या तुलनेत अर्ज नोंदणीत बरीच वाढ झाली आहे. यंदा रिक्त जागांचे प्रमाण कमी असेल.

- डॉ. मनोज डायगव्हाणे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन

कौशल्य आत्मसात करणार

‘पॉलिटेक्निक’मधून नेमके कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळते. त्यामुळे हा अभ्यासक्रम मी निवडला आहे. स्टार्टअपसाठी मी आतापासून नियोजन करत असून हे कौशल्य माझ्या कामात येईल.

- शिवांश इंगळे, विद्यार्थी

अभियांत्रिकीचे स्वप्न

अभियांत्रिकीला प्रवेश घेण्याचे माझे स्वप्न आहे. ‘पॉलिटेक्निक’मुळे सखोल तांत्रिक ज्ञान मिळते व त्यानंतर पदवीला थेट व्दितीय वर्षात प्रवेश घेण्याची संधी मिळते. यातून मी माझी स्वप्नपूर्ती करेन.

- आदित्य पाटील, विद्यार्थी

चौकट

विभागातील प्रवेश क्षमता : १३ हजार १२६

महाविद्यालये - ५०

अर्ज नोंदणी - ७ हजार ७१४