शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागात स्वाइन फ्लूचे सहा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनाचे संकट कमी होत नाही तोच स्वाइन फ्लूने डोकेवर काढले आहे. नागपूर विभागात सहा रुग्णांची नोंद झाली ...

नागपूर : कोरोनाचे संकट कमी होत नाही तोच स्वाइन फ्लूने डोकेवर काढले आहे. नागपूर विभागात सहा रुग्णांची नोंद झाली असून, नागपूर जिल्ह्यात तीन, भंडारा जिल्ह्यात दोन, तर वर्धा जिल्ह्यात एक रुग्ण आढळून आला आहे. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. परंतु त्याची अधिकृत नोंद झालेली नाही.

स्वाइन फ्लूची ओळख २००९ मध्ये झाली. त्यावर्षी नागपूर विभागातील नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्हा मिळून या आजाराने ४५ रुग्णांचे बळी घेतले होते. त्यानंतर २०१० मध्ये ५४ मृत्यूंची नोंद झाली. मात्र, २०११ ते २०१४ पर्यंत मृत्यूची संख्या अर्ध्याहून कमी झाली. परंतु २०१५ मध्ये या आजाराचा प्रकोप वाढला. विभागात सर्वाधिक ७९० रुग्ण व १७९ रुग्णांचे जीव गेले. २०१६ मध्ये ७८ रुग्ण व दोनच रुग्णांच्या मृत्यूची नोंद होती. मात्र, २०१७ मध्ये ऐन उन्हाळ्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली. ६३४ रुग्ण, तर ११९ बळी गेले. २०१८ मध्ये ६३ रुग्ण व ११ मृत्यूची नोंद तर २०१९ मध्ये ३६१ रुग्ण व ३९ मृत्यू झाले. २०२०मध्ये कोरोनाला सुरुवात होताच एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. परंतु यावर्षी महिन्याभरात सहा रुग्ण आढळून आले आहेत.

-शहरात दोन तर ग्रामीणमध्ये एक रुग्ण

स्वाइन फ्लूचे नागपूर शहरात दोन, तर ग्रामीणमध्ये एक रुग्ण आढळून आला. शहरातील दोन रुग्णांमध्ये एक जरीपटका, तर दुसरा रुग्ण लॉ कॉलेज चौक परिसरातील आहे. ग्रामीणमधील एक रुग्ण हा भिलगाव येथील आहे. प्राप्त माहितीनुसार, शहरातील स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्णाला एका खासगी हॉस्पिटलमधून मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. हा रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. परंतु त्याच रात्री नातेवाइकांनी पुन्हा खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दोन रुग्णांमधून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परंतु उपसंचालक आरोग्य विभागाकडून होणाऱ्या ‘डेथ ऑडिट’ समितीपुढे हे प्रकरण गेल्यावरच मृत्यूची नोंद होणार आहे.

-ही आहेत लक्षणे

:: ताप (१०० अंश फॅरन्हाइट किंवा त्याहून जास्त)

:: खोकला

:: सर्दी

:: थकवा

:: अंगदुखी

:: डोकेदुखी

:: घसा खवखवणे किंवा दुखणे

:: थंडी भरून येणे