शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सावनेर, कळमेश्वरमध्ये स्थिती आणखी बिघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST

सावनेर/कामठी/काटोल/नरखेड/कळमेश्वर/ कुही/ उमरेड/ रामटेक /कन्हान/मौदा : नागपूर जिल्ह्यात सावनेर, कळमेश्वर आणि हिंगणा तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत रोज दुपटीने वाढ होत ...

सावनेर/कामठी/काटोल/नरखेड/कळमेश्वर/ कुही/ उमरेड/ रामटेक /कन्हान/मौदा : नागपूर जिल्ह्यात सावनेर, कळमेश्वर आणि हिंगणा तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत रोज दुपटीने वाढ होत आहे. सावनेर तालुक्यात गुरुवारी २७४ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ८६ तर ग्रामीण भागातील १८८ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात ५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात दहेगाव येथे तीन तर चिचोली (खापरखेडा) आणि कोच्छी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

कळमेश्वर तालुक्यात १२५ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील २६ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात गोंडखैरी येथे १६, धापेवाडा (१४), तेलगाव (१३), मोहपा (९), मांडवी, वरोडा येथे (प्रत्येकी ८), तेलकामठी (७), तिष्टी (३), भंडागी, तोंडाखैरी, वाढोणा, कळंबी येथे प्रत्येकी दोन, तर धुरखेडा, आदासा, वाढोणा बु, सोनपूर, सावळी बु, निमजी, निमजी खदान, खापरी, संवद्री, सुसंद्री, कोहळी, पिपळा आणि परसोडी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

हिंगणा तालुक्यात ८०० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ८९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात हिंगणा येथील ३१, वानाडोंगरी (२३), डिगडोह (७), टाकळघाट (६), इसासनी (५), तुरकमारी (४), रायपूर, वडधामना, नागलवाडी, गुमगाव येथे प्रत्येकी २ तर मंगरुळ, सावळी बिबी, जुनेवानी, टेंभरी व मोंढा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ५४२९ इतकी झाली आहे. यातील ४२०९ रुग्ण बरे झाले, तर ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नरखेड तालुक्यात १७ रुग्णांची नोंद झाली. यात नरखेड शहरातील ८, तर ग्रामीण भागातील ९ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३७५ तर शहरात ७२ इतकी झाली आहे. गुरुवारी मदना येथे ७ तर भिष्णूर आणि जामगाव येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गुरुवारी १२४ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. या केंद्राअंतर्गत आतापर्यंत १३७१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील ९८८ रुग्ण बरे झाले आहेत, तर ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पारशिवनी येथे ६ रुग्णांची नोंद झाली. या महिन्यात पारशिवनी तालुक्यात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर ७२ नागरिक बाधित झाले आहेत.

मौदा तालुक्यात ८ रुग्णांची भर पडली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ९३९ झाली आहे. यातील ७६१ रुग्ण बरे झाले आहेत, तर ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

उमरेड तालुक्यात ४८ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील १२, तर ग्रामीण भागातील ३६ जणांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ४९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कुही तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात १२७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही शहर, चिकना, मांगली येथे प्रत्येकी दोन रुग्णांचा तर हरदोली राजा (४) आणि तारणा येथील एकाचा समावेश आहे.