शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात आंबेडकरी आंदोलनाची परिस्थिती निराशाजनक

By admin | Updated: December 13, 2015 03:02 IST

उत्तर प्रदेशात आंबेडकरी आंदोलनाची परिस्थिती निराशाजनक झाली आहे, असे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक कंवल भारती यांनी सांगितले.

कंवल भारती यांचे मत : एस. सी. एस. व्याख्यानमालानागपूर : उत्तर प्रदेशात आंबेडकरी आंदोलनाची परिस्थिती निराशाजनक झाली आहे, असे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक कंवल भारती यांनी सांगितले. ते एस. सी. एस. व्याख्यानमालेत ‘आंबेडकरी आंदोलन आणि उत्तर प्रदेशचे वास्तव’ विषयावर बोलत होते.भारतीय रिपब्लिकन पक्षामध्ये सुरुवातीला चांगले नेते होते. सर्वत्र भारावलेले वातावरण होते. बुद्धप्रिय मौर्य व संघप्रिय गौतम हे दोन नेते आंबेडकरी आंदोलनातील शेर होते. त्यांच्या एका आवाजावर लाखो दलित एकत्र येत होते. परंतु प्रति-क्रांतीने आंबेडकरी आंदोलनाचा प्रभाव कमी केला. बुद्धप्रिय मौर्य यांना काँग्रेसने तर, संघप्रिय गौतम यांना भाजपाने ओढून घेतले. हे दोघेही आज कोठे आहेत, हे कोणालाही माहीत नाही. त्यांच्या आवाजावर १० लोकही जमण्याची परिस्थिती सध्या नाही. रिपब्लिकन पक्षाच्या या कमकुवतपणाचा लाभ कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्षाने घेतला होता. परंतु सत्ता व मते मिळविण्यासाठी त्यांनीही आंबेडकरी आंदोलनाला मोठे केले नाही, अशी खंत भारती यांनी व्यक्त केली. सध्या समाजात आमुलाग्र वैचारिक परिवर्तन झाले आहे. त्यासोबतच समाजात आंबेडकरी आंदोलनाबाबत संभ्रमही निर्माण झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष इत्यादी पक्ष आपापल्या चष्म्यातून आंबेडकरी आंदोलनाकडे पाहात आहेत. यामुळे आंबेडकरी आंदोलनाचे प्रचंड नुकसान होत आहे, याकडे भारती यांनी लक्ष वेधले.कांशीराम यांनी मायावती यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपासोबत गठबंधन केले होते. भाजपा सांप्रदायिक पक्ष नाही, असे जाहीर मतप्रदर्शन त्यांनी केले होते. याचा फटका आंबेडकरी आंदोलनाला बसला. याशिवाय मायावती जातीनिहाय संमेलने आयोजित करीत आहेत. बाबासाहेबांना जात नष्ट करायची होती, परंतु मायावती जातींना बळ देत आहेत. परिणामी प्रत्येक जातीतील नागरिक स्वत:चे भले करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांसोबत जात आहेत. त्याचा वाईट परिणाम आंबेडकरी आंदोलनावर पडलाय. शत्रूंना ओळखल्याशिवाय दलितांचा विकास होऊ शकत नाही, असे मत भारती यांनी व्यक्त केले.संत चोखामेळा समाज मुलींची शिक्षण संस्थेतर्फे पाचपावलीतील एस. सी. एस. शाळेच्या प्रांगणात ही तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानमालेचा आज पहिला दिवस होता. संस्थेचे अध्यक्ष प्रा. रणजित मेश्राम अध्यक्षस्थानी तर उपाध्यक्ष व्ही. टी. चिकटे, एस. डी. सूर्यवंशी, सचिव पवन गजभिये, अधीक्षक प्रा. भाऊ लोखंडे, सदस्य श्याम कांबळे, प्राचार्या मंगला पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.(प्रतिनिधी)