शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सीताराम कुंटे, नंदकुमार यांनी मागितली हायकोर्टाची क्षमा

By admin | Updated: February 25, 2016 03:01 IST

आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या वेतनवाढीसंदर्भातील प्रकरणात वित्त विभागाचे प्रधान सचिव (खर्च) सीताराम कुंटे व शालेय शिक्षण विभागाचे सचिव..

आदेशाची अवमानना : आदर्श शिक्षकांच्या वेतनवाढीचे प्रकरणनागपूर : आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या वेतनवाढीसंदर्भातील प्रकरणात वित्त विभागाचे प्रधान सचिव (खर्च) सीताराम कुंटे व शालेय शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची क्षमा मागितली आहे. आदेशाचे पालन झाले नाही म्हणून न्यायालयाने दोन्ही अधिकाऱ्यांना समन्स बजावला होता. त्यानुसार त्यांनी १६ फेब्रुवारी रोजी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून क्षमा मागितली. न्यायालयाने त्यांची क्षमा स्वीकारून त्यांना अवमानना कारवाईतून मुक्त केले आहे. तसेच, यापुढे शासकीय अधिकारी न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या प्रकरणावर आता १५ मार्च रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.राज्य व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी देण्याचे शासनाचे धोरण होते. ४ सप्टेंबर २०१४ रोजी जीआर जारी करून या धोरणात बदल करण्यात आला. आदर्श शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी न देता एकमुस्त एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय ४ सप्टेंबर २०१४ पासून पुढे लागू असताना शासनाने त्यापूर्वीच्या अनेक आदर्श शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी दिल्या नाहीत. यामुळे नागपूर, अमरावती, गोंदिया, अकोला येथील ३८ शिक्षकांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. १६ डिसेंबर २०१४ रोजी शासनाने ४ सप्टेंबर २०१४ रोजीचा जीआर त्यापूर्वीच्या आदर्श शिक्षकांना लागू होणार नाही व त्यांना दोन आगाऊ वेतनवाढी दिल्या जातील, असे न्यायालयाला सांगितले होते. यामुळे न्यायालयाने सहा महिन्यांत वेतनवाढ देण्याचे निर्देश देऊन याचिका निकाली काढली होती. शासनाने या आदेशाचे पालन केले नाही. परिणामी शिक्षकांनी तीन अवमानना याचिका दाखल केल्या होत्या. त्यात नंदकुमार यांनी ९ डिसेंबर २०१५ रोजी प्रतिज्ञापत्र सादर करून न्यायालयाच्या १६ डिसेंबर २०१४ रोजीच्या आदेशावर चार आठवड्यात अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली होती. यानंतर न्यायालयाने तिन्ही अवमानना याचिका निकाली काढल्या होत्या. शासनाने ही ग्वाहीदेखील पाळली नाही. यामुळे शिक्षकांनी दुसऱ्यांदा अवमानना याचिका दाखल केल्या आहेत. या प्रकरणात आदेशाची स्पष्टपणे अवमानना झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे न्यायालयाने सीताराम कुंटे व नंदकुमार यांना समन्स बजावला होता. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. ए. आर. देशपांडे तर, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली.