शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

त्या बहिणीला दुसºया भावाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:24 IST

दोन्ही किडन्या निकामी झालेल्या व हृदयाचा गंभीर आजार असलेल्या बहिणीवरील उपचारासाठी भावाने कर्ज काढून उपचार केले, परंतु उपचाराचा खर्च वाढतच गेल्याने भाऊच कर्जबाजारी झाला....

ठळक मुद्देसरोदे यांचा कुरेशी कुटुंबाला मदतीचा हात : बहिणीला जगविण्यासाठी भावाची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन्ही किडन्या निकामी झालेल्या व हृदयाचा गंभीर आजार असलेल्या बहिणीवरील उपचारासाठी भावाने कर्ज काढून उपचार केले, परंतु उपचाराचा खर्च वाढतच गेल्याने भाऊच कर्जबाजारी झाला तरीही बहिणीच्या उपचारासाठी तो दारोदारी फिरतोय. समाजाचे आर्थिक पाठबळ मिळाल्यास बहीण वाचेल, तिच्या मुलांना, घराला मोठा आधार मिळेल, या एकमेव आशेवर तो आहे. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच असंवेदनशीलतेचा आरोप झेलणाºया याच समाजातून आकाश हरिदास सरोदे यांनी त्या भावापुढे मदतीचा हात सरसावला. २५ हजाराचा धनादेश दिला.घरात आधीच दारिद्र्य त्यात नाहिद अंजूम कुरेशी (३२) रा. गड्डीगोदाम हिला काही कळण्याच्या आतच कठोर आघात सोसण्याची वेळ आली. भाऊ साजीद अंजूम तिच्या उपचारासाठी काही करण्याची जिद्द बाळगून आहे. परंतु दारिद्र्य आड येत असल्याने त्याचे प्रयत्न थिटे पडत आहे. ‘लोकमत’ने ‘मदतीचा हात’ या सदरातून कुरेशी कुटुंबाची व्यथा मांडली. या वृत्ताने समाजमन गहिवरले. अनेकांनी साजीदला फोन करून हिंमत दिली. काहींनी मोफत उपचार करणाºया इस्पितळांची नावे सांगितली.‘मायडाय डिजिटल होर्डिंग कंपनी’चे संचालक आकाश सरोदे यांनी ‘लोकमत भवन’ गाठले. साजीद अंजूम यांनाही बोलवून घेतले. कुठलाही गाजावाजा न करता त्याच्या हातात धनादेश ठेवला. यावेळी सरोदे म्हणाले, लहानपणी जो संघर्ष केला त्याची जाण आहे. म्हणूनच जिथे जिथे आवश्यक वाटते तिथे तिथे मदत करण्याचा माझा प्रयत्न असतो. दु:ख याचे वाटते की, ही मदत फार अल्प आहे, असेही ते म्हणाले.