शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएचडी’ नोंदणीसाठी ‘पेट’चा एकच टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएच.डी.’ नोंदणीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएच.डी.’ नोंदणीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘पेट’च्या दोन टप्प्यांमुळे नोंदणी करणाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जात होते; मात्र आता विद्यापीठाने ‘पेट-२’ रद्द केली आहे. त्यामुळे आता केवळ एकाच परीक्षेचे आव्हान राहणार आहे.

विद्यापीठात पीएच.डीची बजबजपुरी माजल्यामुळे विद्यापीठाने सुरुवातीला ‘पेट’ उत्तीर्ण होणे अनिवार्य केले. डॉ.प्रमोद येवले यांच्या प्र-कुलगुरूपदाच्या कार्यकाळात विषयनिहाय ‘पेट-२’ सुरू करण्यात आली. काठिण्यपातळीत वाढ झाल्याने नोंदणीसाठी पात्र ठरणाऱ्यांची संख्या कमी झाली. शिवाय मानव्यशास्त्राच्या उमेदवारांची संख्या बरीच रोडावली. त्यामुळे विधीसभेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. आर.जी. भोयर व डॉ. पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या तयार करण्यात आल्या होत्या. या समितीने पीएच.डी.च्या जाचक अटींमध्ये बदल करीत नवा शिफारशीचा समावेश केला होता. त्यानुसार विद्यापीठाने शिफारशी मान्य केल्या असून, पीएच.डी. संदर्भात अधिसूचना काढली आहे.

‘रिसर्च मेथडॉलॉजी’ आणि ‘अ‍ॅप्टिट्यूड’वर भर

विद्यापीठाने ‘पेट-१’च्या स्वरूपात बदल केला आहे. ‘रिसर्च मेथडॉलॉजी’ आणि ‘जनरल अ‍ॅप्टिट्यूड’वर परीक्षा आधारित असेल. शिवाय ५० प्रश्न हे बहुपर्यायी असतील. मार्च महिन्यात नव्या नियमावलीनुसार ‘पेट’ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.