शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गर्भलिंग निदान आणि तांत्रिक चुका करणाऱ्यांना एकच शिक्षा!

By admin | Updated: August 22, 2015 03:04 IST

गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याला आमचा विरोध नाही. कारवाईलाही विरोध नाही.

इंडियन रेडिओलॉजिकल इमेजिंग असोसिएशनने वेधले लक्ष: निदान करण्याची मागणी करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल व्हावानागपूर : गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याला आमचा विरोध नाही. कारवाईलाही विरोध नाही. परंतु तांत्रिक चुका करणाऱ्यांना व गर्भलिंगनिदान करणाऱ्यांना एकाच प्रकारची शिक्षा होत असल्याने डॉक्टर व सोनोग्राफी सेंटर अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, राज्यात या संदर्भातील सुमारे ४०० प्रकरणे समोर आली असताना यात ९० टक्के तांत्रिक चूक म्हणजे रजिस्टरवर योग्य नोंद न ठेवणे वगैरे कारणांवरून जबाबदार ठरविण्यात आले आहे. याचा गंभीरतेने विचार होणे आवश्यक आहे, तसेच यात दोषी डॉक्टरांसोबतच गर्भलिंग निदान करण्याची मागणी करणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई व्हावी, अशी इंडियन रेडिओलॉजिकल इमेजिंग असोसिएशनची मागणी आहे. या असोसिएशनचे विदर्भाचे नवनियुक्त अध्यक्ष व प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. प्रशांत ओंकार, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुरेश चांडक, माजी अध्यक्ष डॉ. मधुसूदन सारडा व डॉ. हरीश चांडक यांनी लोकमतला सदिच्छा भेट दिली. त्यांनी गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यांमधील तांत्रिक चुका, त्रुटी आणि डॉक्टरांना होणारा त्रास या बद्दलचे आपले विचार मांडले.डॉ. ओंकार म्हणाले, खूप चांगला उद्देश ठेवून हा कायदा केला आहे. परंतु दुर्दैवाने याचा उद्देश सफल झाला नसल्याचे दिसून येते. कारण दोन दशकांपूर्वी हा कायदा आल्यानंतरही मुलींचे प्रमाण घटले, हे त्याचे द्योतक आहे. मात्र याची झळ अनेक निरपराध डॉक्टरांना बसत आहे. केवळ कागदोपत्री चुकांसाठी तुरुंगात जाण्याची वेळ येत असल्याने कित्येक ज्येष्ठ अनुभवी डॉक्टरांनी सोनोग्राफी करणेच बंद केले आहे तर काही बंद करण्याच्या विचारात आहे. सोनोग्राफी गर्भवती स्त्रियांसाठीच नव्हे तर एकंदरीत रुग्णसेवेसाठी वरदान असलेले सक्षम तंत्रज्ञान आहे. परंतु अर्धवट कायद्यामुळे या तंत्रज्ञानाची पुरती वाट लावली जात आहे, असेच म्हणावे लागेल. (प्रतिनिधी)