शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

गायन आणि सतारवादनाने झंकारला महोत्सव

By admin | Updated: August 25, 2014 01:13 IST

सप्तक आणि महाराष्ट्र ललित कला निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणिजान संगीत महोत्सवाचे समापन गौरी पाठारे यांच्या सुमधुर गायनाने आणि प्रतीक चौधरी यांच्या सुरेल सतारवादनाने झाले.

नागपूर : सप्तक आणि महाराष्ट्र ललित कला निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणिजान संगीत महोत्सवाचे समापन गौरी पाठारे यांच्या सुमधुर गायनाने आणि प्रतीक चौधरी यांच्या सुरेल सतारवादनाने झाले. गायन आणि सुरेल सतारवादनाने हा महोत्सव झंकारला. सुरमणी गौरी पाठारे यांच्या गायनासह महोत्सवाचे आजचे प्रथम पुष्प गुंफण्यात आले. जयपूर-ग्वाल्हेर घराण्याची गायकी प्रतिध्वनीत करणाऱ्या या गायिकेच्या गायनाची विशेष प्रतीक्षा व अपेक्षा उपस्थित रसिकांना होती. अनेक गणमान्य महोत्सव आणि मराठी चित्रपटात पार्श्वगायन करणाऱ्या या गायिकेचे हे एकूणच प्रशंसनीय गायन होते. गौरी यांनी राग ललितगौरीने गायनाला प्रारंभ केला. विलंबित ‘दरस दिखा जा...’ व द्रुत लयीत ‘काहू समझाऊ मानत नाही...’ या बंदिशीने त्यांनी रागाचा हळुवार विस्तार केला. निकोप सुरेल स्वर, लयकारीचे मोहक विभ्रम, बोलबंदिशींचे लाघव्यपूर्ण उच्चारणामुळे त्यांचे गायन रसिकांची दाद घेणारे ठरले. यानंतर त्यांनी राग दुर्गा तसेच उपशास्त्रीय रसिला दादरा ‘कैसे जिया तरसत पियाबीन...’ सादर करून गायनाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर संदेश पोपटकर आणि संवादिनीवर श्रीकांत पिसे यांनी साथ केली. मानसी देशपांडे आणि अर्चना सायगावकर यांनी तानपुऱ्यावर साथ केली. त्यानंतर दिल्ली येथील युवा आणि प्रतिभाशाली कलावंत प्रतीक चौधरी यांचे श्रुतीमधुर सतारवादन सादर करण्यात आले. पं. तानसेन यांच्या सेनिया घराण्याची पूर्वपरंपरा लाभलेल्या या वादकाने राग मारुबिहाग स्वरांकित करून आपल्या चतुरस्र वादनक्षमतेचा परिचय दिला. प्रारंभी ध्रुपद अंगाची सुरेल आलापी व नंतर त्रिताल निबद्ध मसिदखानी गत असे त्यांचे वादन आनंददायी होते. घराणेदार तालीम, रागाची शुद्धता, लयकारीवरील पकड आणि ताल अंगाचे उत्तम संचालन या वैशिष्ट्यांसह त्यांनी रसिकांना प्रभावित केले. विलक्षण दाणेदार स्वरांची बोलकी आंस, मींडची जोरदार अनुभूती व वादनातील माधुर्य यामुळे त्यांनी आपल्या वादनाने या महोत्सवावर आपली मुद्रा टंकित केली. त्यांना तबल्यावर ओजस अडिया यांनी अनुरूप साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन रेणुका देशकर यांनी केले. कलावंतांचे स्वागत पं. सतीश व्यास व प्रकाश दीक्षित यांनी केले. डॉ. उदय गुप्ते, उदय पाटणकर, विलास मानेकर आणि सहकाऱ्यांनी हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)