शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सिकलसेलग्रस्तांच्या निधीतही बॅकलॉग !

By admin | Updated: October 25, 2015 02:53 IST

महाराष्ट्रात सर्वाधिक सिकलसेल रुग्ण विदर्भात आहेत. परंतु शासनातर्फे मात्र खूप कमी निधी उपलब्ध करून दिला जात आहे.

मुंबईला जादा निधी : विदर्भात कमतरता नागपूर : महाराष्ट्रात सर्वाधिक सिकलसेल रुग्ण विदर्भात आहेत. परंतु शासनातर्फे मात्र खूप कमी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. दुसरीकडे मुंबईतील काही मोजक्या रुग्णांवर मात्र प्रचंड निधी खर्च केला असल्याची बाब माहितीच्या अधिकारांतर्गत उघडकीस आली आहे. मुंबईतील एका सिकलसेलग्रस्त रुग्णावर २०१३ ते २०१५ या वर्षात १.७३ लाख रुपयाचा निधी सरकारतर्फे देण्यात आला. तर नागपूरच्या एका रुग्णावर मात्र २७९५ रुपये खर्च करण्यत आले. या खर्चावरून विदर्भावरील अन्याय स्पष्ट दिसून येत आहे. सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत सिकलसेल रुग्णांना देण्यात येणाऱ्या निधी संदर्भात माहिती मागितली होती. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) वर्ष २०१३ ते २०१५ या दरम्यान २२३६ रुग्ण भरती झाले. त्यांच्यासाठी डायरेक्टर आॅफ मेडिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (डीएमईआर) तर्फे ३८.५० लाख रुपये आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत २४ लाख देण्यात आले. प्रति रुग्ण २७९५ रुपये खर्च झाले. त्याचप्रकारे मेयोमध्ये भरती १६५५ रुग्णंसाठी तितकाच निधी देण्यात आला. अशा परिस्थितीत येथील प्रति रुग्णावर ३७७६ रुपये खर्च झाले. निधी वितरणात झालेल्या भेदभावाचा मुद्दा संपक रामटेके यांनी राज्यस्तरावर उचलला. त्यानंतर निधी वितरण समितीने २०१३ मध्ये डॉ. नीता जांगडे आणि २०१४ व २०१५ मध्ये डॉ. सूर्या राव यांना प्रमुख करण्यात आले. तरीही भेदभाव थांबला नाही. रुग्णांच्या संख्येनुसार निधी न देता शहरानुसार निधी वितरित करण्यात आला. यामुळे विदर्भातील सिकलसेलग्रस्तांवर अन्याय झाला. मेडिकल व मेयोतील सिकलसेलग्रस्तांना औषध व इतर वैद्यकीय सामुग्रीसाठी खूप संषर्ष करावा लागतो. तरीही आरोग्य विभागाचे डोळे उघडलेले नाही. मुंबई, नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांच्या मदतीसाठी पाठविण्यात आलेल्या निधीमधून फर्निचर, प्रिंटर, कॉम्प्युटर आदींची खरेदी करण्यात आल्याची बाबही उघडकीस आली आहे. त्यामुळे याचे आॅडिट करण्यात यावे आणि प्रत्येक रुग्णाला पुरेसा निधी मिळावा, अशी मागणी संपत रामटेके यांनी केली आहे. (प्रतिनिधी)