शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

श्रुतीमधूर वादन आणि रसिल्या गायनाची मैफिल

By admin | Updated: August 21, 2014 01:16 IST

प्रतिभावंत कलावंतांना कला सादरीकरणासाठी प्रतिष्ठित व्यासपीठ प्रदान करणाऱ्या गुणिजान संगीत महोत्सवाचे आयोजन आजपासून सायंटिफिक सभागृहात करण्यात आले. या संगीत महोत्सवाचे

नागपूर : प्रतिभावंत कलावंतांना कला सादरीकरणासाठी प्रतिष्ठित व्यासपीठ प्रदान करणाऱ्या गुणिजान संगीत महोत्सवाचे आयोजन आजपासून सायंटिफिक सभागृहात करण्यात आले. या संगीत महोत्सवाचे आयोजन सप्तक आणि ललित कला निधी, मुंबई यांच्यातर्फे करण्यात आले. हा महोत्सव संगीततज्ज्ञ पं. सी. आर. व्यास यांच्या स्मृतींना समर्पित करण्यात आला. या द्विदिवसीय महोत्सवाचा आरंभ आज करण्यात आला. मूळ नागपूर येथील पण सध्या मुंबई येथे स्थायिक असलेल्या निनाद मुळावकर यांच्या बासरीवादनाने महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. अंगभूत वादनक्षमता, घराणेदार तालीम व शास्त्र नियमांच्या चौकटीत राग स्वरूपाची सौंदर्यात्मक मांडणी करण्याचे वादकाचे कौशल्य या वैशिष्ट्यांसह त्यांचे वादन प्रारंभापासूनच श्रुतीमधूर ठरले. निनाद यांनी वादनाचा प्रारंभ राग यमन कल्याणने केला. मधाळ आलापीसह विलंबित व द्रुत गत वादनासह वादकाने केलेला रागविस्तार त्यांच्या कुशल वादनाला अधोरेखित करणारा होता. सुरेल, मधाळ व भरीव फुंक हे बलस्थान असलेल्या या कलावंतांने रागाचे सौंदर्य व प्रासादिकता स्वरांकित करीत स्वरसंगीत प्रवाही असते, याची प्रचिती दिली. यमन तर सर्व रागांचा राजाच समजला जातो. राग सादर करताना मिंड, गमक, पुकार हे कठीण प्रकार श्वासावर कमालीचे नियंत्रण ठेवीत त्यांनी सादर केले. राग मिश्र पिलू सादर करून त्यांनी वादनाचे समापन केले. ओजस आडिया यांनी त्यांना प्रशंसनीय सहसंगत केली. यानंतर सुविख्यात गायिका मिता पंडित यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग भूपने गायनाला प्रारंभ केला. गायिकेचा गाजदार अनोखा आवाज, स्वरबंध आणि अर्थभावपूर्ण बंदिश, तराण्यासह झालेल्या रागविस्ताराने त्यांचे गायन रसिकांना आनंद देणारे ठरले. त्यांना तबल्यावर संदेश पोपटकर तर संवादिनीवर श्रीकांत पिसे यांनी आणि तानपुऱ्यावर मोनिका देशमुख व मानसी देशपांडे यांनी साथसंगत केली. निवेदन रेणुका देशकर यांनी केले. याप्रसंगी पं. व्यास यांचे पुत्र पं. सतीश व्यास यांनी मनोगत व्यक्त केले. कलावंतांचे स्वागत सप्तकचे विलास मानेकर, उदय गुप्ते आणि हरजिंदरसिंग यांनी केले. (प्रतिनिधी)