शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

श्री सुमतिनाथ जैन श्वेतांबर मंदिरात चातुर्मास प्रवेश संपन्न

By admin | Updated: July 23, 2015 02:44 IST

श्री सुमतिनाथ स्वामी जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाद्वारे जैन संतांच्या पवित्र चातुर्मासाचे आयोजन श्री सुमतिनाथ जैन मंदिर, रामदासपेठ येथे आयोजित करण्यात आले आहे.

नागपूर : श्री सुमतिनाथ स्वामी जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाद्वारे जैन संतांच्या पवित्र चातुर्मासाचे आयोजन श्री सुमतिनाथ जैन मंदिर, रामदासपेठ येथे आयोजित करण्यात आले आहे. आज जैन मुनिश्री व साध्वींचा चातुर्मास प्रवेश संपन्न झाला. बुधवारी सकाळी भव्य शोभायात्रा गुजरात भवन धंतोली येथून काढण्यात आली. शोभायात्रेत जैन आचार्य पूर्णचंद्र सुरीश्वरजी म.सा. यांच्यासोबत शिष्य मुनिश्री प्रियदर्शन विजयजी, पुनितचंद्र विजयजी, साध्वी इंद्रवंदिताजी, इंद्रनिधीजी उपस्थित होते. ही शोभायात्रा रामदासपेठेतील प्रमुख मार्गावरून फिरून मंदिरात पोहोचली. आचार्य पूर्णचंद्र सुरीश्वर महाराजांनी आपल्या शिष्यांसह चातुर्मासात प्रवेश केला. यावेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष खा. विजय दर्डा यांनी सर्व मुनिश्री व साध्वींचे अभिनंदन केले. चातुर्मास समारोहात चार महिने सत्संग, भक्ती, संस्कार शिबिर व विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. चातुर्मास समारोहाचे लाभार्थी विजयाबेन शोभागचंद सावडिया परिवार व कन्नूभाई सावडिया परिवार आहे. मुनिश्रींच्या प्रवचनाला गुरुवारपासून प्रारंभ होईल. दररोज सकाळी ९ ते १०.३० प्रवचन होईल. (प्रतिनिधी)आचार्य पूर्णचंद्र सुरीश्वरजी म.सा. यांचा आज जन्मदिनअध्यात्मयोगी आचार्यदेव श्रीमद् विजय कलापूर्ण सुरीश्वरजी म.सा. यांचे शिष्यरत्न आचार्यदेव श्रीमद् विजय पूर्णचंद्र सुरीश्वरजी म.सा. यांचा भव्य चातुर्मास समारोह आराधना भवन, श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर, वर्धमाननगर येथे साजरा करण्यात येत आहे. येथे आचार्यश्री यांचा ५५ वा जन्मदिन गुरुवारी २३ जुलैला संघाद्वारे भक्तिभावाने साजरा करण्यात येईल. यानिमित्त सकाळी ९ ते १०.३० पर्यंत अष्टप्रतिहार्य वंदना करण्यात येईल. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती सकल जैन समाजाचे अध्यक्ष खा. विजय दर्डा यांनी केली आहे.