शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

शिक्षणाच्या माध्यमातून विकासाचा मार्ग दाखवावा

By admin | Updated: December 24, 2014 00:44 IST

उपेक्षित असलेल्या आदिवासी समाजातील तरु णांना मूळ प्रवाहात आणून शिक्षणाच्या माध्यमातून विकासाचे मार्ग दाखविणे आवश्यक आहे. यासाठी निधी आणि लाखो रु पयांच्या योजना असाव्या लागतातच असे नाही,

आंदोलनकर्त्या राजश्रीचे मत : मानसिकताही बदलणे गरजेचेनागपूर : उपेक्षित असलेल्या आदिवासी समाजातील तरु णांना मूळ प्रवाहात आणून शिक्षणाच्या माध्यमातून विकासाचे मार्ग दाखविणे आवश्यक आहे. यासाठी निधी आणि लाखो रु पयांच्या योजना असाव्या लागतातच असे नाही, त्यासाठीची मानसिकता असावी लागते, असे परखड मत राजश्री इवनाते या विद्यार्थिनीने मांडले. कायद्याचा अभ्यास करीत असलेली राजश्री आज आदिवासी विद्यार्थ्यांचा हक्क निर्धार मोर्चात सहभागी झाली होती. या मोर्चात विविध मागण्यांसाठी ती नारे देत असतानाच सहभागी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्वही समजावून सांगत होती. राजश्रीला बोलते केले असता ती म्हणाली, एकेकाळी भारतभूचा राजा असलेला मूळ मालक मूळनिवासी आदिवासी आज अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी दाहीदिशा भटकत आहे. शिक्षण आणि विकासापासून आदिवासी समाज अद्याप दूरच आहे. आमच्यापैकी अनेक जणांना दहावीच्या पुढे मजल मारता येत नाही. परिस्थितीमुळे सर्वांचेच शिक्षण अर्धवट राहत आहे. मोलमजुरी करून आयुष्य घालवणे इतकाच त्यांच्यापुढे पर्याय आहे. यावर उपाय शोधणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत पदवीचे शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्याने आपल्यासोबत असलेल्या मित्रांना शिक्षणाची आणि हक्कांची साद घालणे आवश्यक आहे. शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे महत्त्वाचे झाले आहे. याचमुळे चित्र बदलेल. केंद्र आणि राज्य सरकारकडून या समाजाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी त्या खऱ्या अर्थाने पोहोचतच नाहीत; ही जबाबदारी प्रामुख्याने सरकारची आहे. परंतु याकडे डोळसपणे पाहण्याचीही जबाबदारी आम्हा युवकांवर आली आहे. पूर्वी सह्याद्री पर्वतरांगांपासून मध्य भारतापर्यंत आदिवासींचे स्वतंत्र, संपन्न, समृद्ध राज्ये होती. आदिवासी लोक राजे, सरदार, जहागीरदार, किल्लेदार, जमीनदार, संस्थानिक होते. आदिवासी स्त्रिया पुरु षवेश परिधान करून लढणाऱ्या रणरागिणी होत्या, ही आठवणही आजच्या युवकांना करून देण्याची आणि त्यांना त्यासाठी जागृत करण्याची गरज आहे, अशीही ती म्हणाली. (प्रतिनिधी)