माैदा : चाेरट्याने माेबाइल दुरुस्तीच्या दुकानात हात साफ करीत माेबाइल व इतर साहित्य असा एकूण २७,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माराेडी येथे नुकतीच घडली.
लक्ष्मीकांत उपासराम देशमुख (३०, रा. माराेडी, ता. माैदा) याचे गावात माेबाइल दुरुस्तीचे दुकान आहे. लाॅकडाऊनमुळे दुकान बंद हाेते. त्यातच चाेरट्याने कुणाचेही लक्ष नसताना छताचे टीनपत्रे वाकवून आत प्रवेश केला. यात त्याने दुकानातील १८ हजार रुपये किमतीचे दोन माेबाइल, आठ हजार रुपयांचे ग्राहकांनी दुरुस्तीला दिलेले पाच माेबाइल हॅण्डसेट, एक हजार रुपयांचे मास्क, ३०० रुपयांचे हेडफाेन असा २७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. दुकानात चाेरी झाल्याचे लक्षात येताच त्याने पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार कुथे करीत आहेत.