शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक - विसर्जन करताना ‘सेल्फी’ तिघांच्या जीवावर बेतली

By admin | Updated: September 15, 2016 17:54 IST

आष्टी (शहीद) तालुक्यातील माणिकवाडा येथील युवक गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी तारासावंगा येथील कड नदीच्या पात्रात गेले. विसर्जन करताना त्यांना सेल्फीचा मोह झाला

ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 15 - आष्टी (शहीद) तालुक्यातील माणिकवाडा येथील युवक गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी तारासावंगा येथील कड नदीच्या पात्रात गेले. विसर्जन करताना त्यांना सेल्फीचा मोह झाला. अशातच तोल जावून चारजण पाण्यात बुडाले. यात तिघांचा बुडून मृत्यू झाला, तर एकाचा वाचविण्यात यश आले. ही घटना  गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
हंसराज रमेश सोमकुंवर (२६), केवल सुरेश मसराम (२०) व चेतन गेंदराज नेहारे (१९) अशी मृतकांची नावे आहेत.  या घटनेने माणिकवाडा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेतून पंकज खवशी हा सुदैवाने बचावला. तिघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. बचावलेल्या पंकज खवशी याने लगेच घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली.  तिघांनाही वाचविण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र पाणी जास्त खोल असल्यामुळे यात यश आले नाही. यामध्ये त्या तिघांचाची करुण अंत झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास कानडे, ठाणेदार दिलीप ठाकूर, तारासावंगाचे सरपंच रत्नपाल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. मासेमारी करणारे वघाळ जि. अमरावती येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलविले होते. दुपारी ४ वाजता तिघांचेही मृतदेह गवसले. यानंतर पंचनामा करून मृतदेह आर्वी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी परीसरातील शेकडो नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या घटनेमुळे माणिकवाडा गावावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावकरी एकत्र जमले आहे. तारसावंगा येथील कड नदीवर असलेल्या पुलावरुनच अनेकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केले. माणिकवाडा येथील गावकऱ्यांनीही पुलावरूनच गणेश विसर्जन केले. मात्र  हंसराज सोमकुंवर, केवल मसराम, चेतन नेहारे व पंकज खवशी यांनी नदीच्या पात्रात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. ही मंडळी मूर्ती घेऊन खोल पाण्यात गेलीे. मूर्तीच्या विसर्जनाचा प्रसंग आला तेव्हा त्यांना गणेशमूर्तीसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. सेल्फी घेतानाच त्यांचा तोल गेला. यामध्ये तिघांना आपल्या प्राणास मुकावे लागले.