शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

‘रक्ताचे नाते’ गमावलेली ‘ती’ लग्नाच्या बेडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : कोरोनाच्या महामारीने अनेकांची जीवनगाथाच बदलवून टाकली. कोरोनाच्या लाटेत अनेकांचे आयुष्य अक्षरश: उद्ध्वस्त ...

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : कोरोनाच्या महामारीने अनेकांची जीवनगाथाच बदलवून टाकली. कोरोनाच्या लाटेत अनेकांचे आयुष्य अक्षरश: उद्ध्वस्त झाले. ‘आईची माया आणि पित्याची छत्रछाया’ गमावलेली असंख्य कुटुंबे अजूनही हुंदकेच देत आहेत. कुणाचा भाऊ बेड न मिळाल्याने दगावला तर कुणाच्या बहिणीने कोरोनामुळे अखेरचा श्वास घेतला. काका, मामा, आत्या, मावशी तर कुणाच्या अगदी जीवलग मित्रावरही आघात झाला. अनेकांनी तर रक्ताची नातीसुद्धा गमावली. उमरेड येथील अशाच एका तरुणीच्या आईवडिलांच्या निधनानंतर सांभाळ करणाऱ्या आजीचा कोरोनामुळे जीव गेला. रक्ताच्या नात्यांचे छत्र हरविले. केवळ आजीच तिचा ‘कंठ’ असतानाच दुष्ट कोरोनाने हा आनंदही तिच्यापासून हिसकावला. अशातच सामाजिकतेचा वसा जोपासलेल्या या नगरीने तिचे दु:ख हेरले. तिला हिंमत दिली. ‘घाबरू नकोस, आम्ही आहोत सोबतीला’ असे म्हणत तिला हिंमत दिली. आता उद्या रविवारी (दि.२७) ‘ती’ लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

आमदार राजू पारवे आणि अन्य काहींनी पालकत्त्व स्वीकारल्यानंतर आईवडिलांचे छत्र हरविलेल्या पल्लवी मोहम मसराम या तरुणीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पल्लवीच्या आईचे (संगीता) माहेर उमरेडचे. लग्नानंतर रामटेक येथील मोहन मसराम यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. मोलमजुरी करणाऱ्या या दाम्पत्यांना पल्लवी ही एकुलती एकच! अशातच सुमारे चार ते पाच वर्षापूर्वी लागोपाठ आई-वडिलांच्या मृत्यूने पल्लवी कमालीची हादरली.

तिच्या उमरेड येथील आजीने ‘सावली’ देत तिला सावरले. आजी सुभद्रा सलामे (५५) हिच्या छत्रछायेत पल्लवीचे दु:ख काहीसे हलके झाले होते. अशातच कोरोनाच्या चक्रव्यूहात आजी सुभद्रा सापडली. जीवनमृत्यूच्या लढाईत मृत्यू जिंकला. आजी सुभद्रा हरली. एप्रिल २०२० ला सुभद्रा सलामे यांचा मृत्यू झाला. पल्लवीच्या पायाखालची वाळूच सरकली. ही बाब आमदार राजू पारवे यांना कळताच त्यांनी या मुलीचे पालकत्त्व स्वीकारले.

रविवारी पल्लवी मसराम नागपूर येथील अक्षय पेंदाम या तरुणासाेबत विवाहबद्ध होत आहे. उमरेडच्या महिला महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या पल्लवीस प्रभाकर हत्तीमारे यांनी भावाचे नाते जोपासत बळ दिले. मदतीचा हात दिला. तिच्या लग्नकार्यात मंगेश गिरडकर, घनश्याम लव्हे, नागेश भिवनकर, योगेश मस्की, महेश भुयारकर, मुकेश आंबोने आदी कार्यकर्तेसुद्धा सहकार्य आणि धावपळ करीत आहेत.

.....

२०० जणांचे पालकत्त्व

उमरेड विभागात कोरोनामुळे ३२९ जणांचा हकनाक जीव गेला. यापैकी सुमारे २०० जणांना पालकत्त्व गमवावे लागले. यामध्ये कुणाची आई तर कुणाचा पिता गेला. ‘त्या’ पोरक्या झालेल्या मुला-मुलींचे शिक्षण, लग्नकार्य आदी संपूर्ण जबाबदारी आमदार राजू पारवे यांनी स्वीकारली आहे. त्यांचा आदर्श जोपासत अन्य लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनीसुद्धा या सत्कार्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले जात आहे.

.....

‘ती’ भावूक झाली

रविवारी उमरेडच्या राम मंदिरात नियमावलीचे पालन करीत सकाळी १०.३० वाजता पल्लवी आणि अक्षय बोहल्यावर चढणार आहेत. दरम्यान, शनिवारी सुषमा पारवे यांनी आईचे कर्तव्य पार पाडत पल्लवीला ‘साडी-चोळी’ आणि भेटवस्तू प्रदान केली. यावेळी पल्लवी काहीशी भावूक झाली होती.