शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

शंकरबाबाच्या अनिलचे मेडिकलने घेतले पालकत्व

By admin | Updated: March 20, 2016 02:59 IST

मेडिकलमध्ये सहा दिवसांच्या उपचारानंतर शंकरबाबा पापळकर यांच्या अनिलला शनिवारी सुटी होणार होती. सुटीचे सर्व सोपस्कार पार पडले होते.

राजकुमार बडोले यांनी दिली भेट : आणखी आठ दिवस चालणार उपचारनागपूर : मेडिकलमध्ये सहा दिवसांच्या उपचारानंतर शंकरबाबा पापळकर यांच्या अनिलला शनिवारी सुटी होणार होती. सुटीचे सर्व सोपस्कार पार पडले होते. विभागप्रमुख डॉ. वृंदा सहस्रभोजनी यांनी त्याला तपासले. आणखी आठ दिवस ठेवता येईल का, अशी विचारणा शंकरबाबाकडे केली. पोराला आणखी औषधोपचाराची गरज आहे, आश्रमात ती सोय उपलब्ध होणार नाही, अशी विनंती करताच बाबा गहिवरले. मतिमंद बेवारस अनिलचे मेडिकलने घेतलेले पालकत्व आणि त्याला मिळत असलेली माया पाहून बाबांसोबतच सर्व उपस्थितांचे डोळे भरून आले होते. विशेष म्हणजे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत मेडिकलमध्ये अनिलला भेटले. त्याला आपल्या हातून मिठाई भरवली. ज्यांना स्वत:ची ओळख नाही, नाव नाही अशांना स्वत:चं नाव आणि पित्याचं प्रेम देऊन आधार बनणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला काय म्हणावं? एक-दोन नव्हे तर तब्बल १२५ अनाथ, अपंग मुलांचे पिता झालेले शंकरबाबा पापळकर यांच्या पितृत्वाला म्हणूनच सलाम केला जातो. त्याच बाबाचे एक पोर अनिल मेडिकलमध्ये १४ मार्चपासून उपचार घेत आहे. एक महिन्याचा असताना मुंबईच्या पेडर रोडवर फेकलेल्या अवस्थेत अनिल आढळून आला होता. तेव्हापासून तो बाबाच्या सोबत आहे. मतिमंद असल्याने तो गेली १६ वर्षे खाटेवरच आहे. त्याला खांद्यावर बसवून दुनिया दाखवणारा बाबा त्याच्या प्रकृतीला घेऊन मात्र सहा दिवसांपासून बेचैन होते. मेडिकलच्या २६ क्रमांकाच्या वॉर्डात त्याच्यावर उपचार सुरू होता. डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी एवढेच नव्हे तर वॉर्डातील रुग्ण आणि त्याचे नातेवाईक सर्वच त्याचे मित्र झाले होते. शनिवारी त्याला सुटी होणार या जाणिवेने या सर्वांमध्ये आनंदही होता आणि आता तो भेटणार नाही म्हणून दु:खही होते. परंतु डॉ. सहस्रभोजनी यांनी आणखी काही दिवस त्याला आपल्याकडे ठेवून घेतल्याने वॉर्डात पुन्हा आनंदाचे वातावरण पसरले. सामाजिक न्यायमंत्री बडोले यांनी अनिलला भेट दिली त्यावेळी शंकरबाबा पापळकर, प्रा. संजय नाथे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार, औषध वैद्यकशास्त्रविभागाचे विभाग प्रमुख डॉ. वृंदा सहस्रभोजनी, डॉ. विनय पंचलवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नियमाबाहेर जाऊन मदतहे शासकीय रुग्णालय असले तरी अनिलला नियमाबाहेर जाऊन मदत केली जात आहे. प्रत्येक जण आपल्यापरीने त्याला मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्या उपचारासाठी डॉक्टरांपासून ते कर्मचारी सर्वच एक कुटुंब झाले आहे. -डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल.