शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

हॉटेल अर्जुनमध्ये सेक्स रॅकेट

By admin | Updated: December 28, 2014 00:36 IST

हॉटेलच्या आडोशाने गेल्या अनेक वर्षांपासून चालविला जाणारा गणेशपेठमधील पॉश कुंटणखाना शोधून गुन्हे शाखेच्या पथकाने तीन मुलींना ताब्यात घेतले. त्यात एक मुंबईची आहे.

वारांगना दलाल गजाआड : मुख्य सूत्रधार फरारनागपूर : हॉटेलच्या आडोशाने गेल्या अनेक वर्षांपासून चालविला जाणारा गणेशपेठमधील पॉश कुंटणखाना शोधून गुन्हे शाखेच्या पथकाने तीन मुलींना ताब्यात घेतले. त्यात एक मुंबईची आहे. या प्रकरणी लॉजचा व्यवस्थापक आणि एका दलालाला पोलिसांनी अटक केली. नागपुरातील अनेक हॉटेल आणि लॉजमध्ये वेश्या पुरविणारा सचिन सोनारकर मात्र फरार झाला असून, पोलीस त्याचा ठिकठिकाणाचा शोध घेत आहेत.गणेशपेठ बसस्थानकाजवळ अर्जुन हॉटेल आहे. येथे वेश्याव्यवसाय करवून घेतला जातो, अशी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला त्याची माहिती कळली. ठिकठिकाणच्या अनेक वेश्या बोलवून हॉटेल लॉजमध्ये पुरविणाऱ्या सचिनने मुंबईहून एक वारांगणा बोलविल्याचे कळताच गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पोलिसांचा ग्राहक शुक्रवारी रात्री ७ वाजता अर्जुन हॉटेलमध्ये पोहोचला. त्याने व्यवस्थापक चेतन सारंग सातपुते (वय २७, रा. कॉर्पोरेशन कॉलनी, नागपूर) याच्याशी संपर्क साधला. त्याने चार हजार रुपयात तरुणी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. बोलणी पक्की केल्यानंतर मनीष बाबूराव रामटेके (वय २१, रा. संजयनगर, पांढराबोडी) याने तीन तरुणींना ग्राहकांसमोर आणले. त्यांना रूममध्ये नेल्यानंतर ग्राहकाने बाजूलाच दबा धरून बसलेल्या पोलिसांना संकेत दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, एपीआय अमिता जयपूरकर, पाटील, एएसआय मदने, हवालदार पांडुरंग निकुरे, प्रकाश सिडाम, मुकुंदा, गोपाल वैद्य, अजय घाटोळ, संजय पाटील, योगेश घोडकी, प्रकाश बोंदरे, सुरेश पंधरे, नीलेश आणि रेवतकर तसेच महिला शिपाई अनिता धुर्वे, सुरेखा सांडेकर, अस्मिता मेश्राम आणि सामाजिक कार्यकर्त्या नंदा भोयर यांनी हॉटेलमध्ये धाड घातली. त्या तीनही मुली तसेच व्यवस्थापक चेतन आणि दलाल मनीष या दोघांना ताब्यात घेतले.(प्रतिनिधी)सचिन सोनारकर फरारवेश्या व्यवसायाचे रॅकेट चालविणारा सचिन सोनारकर फरार झाला. ताब्यात घेतलेल्या तरुणींमध्ये एक तरुणी मुंबईची होती. चार दिवसांपूर्वी तिला सचिन सोनारकरने ५ हजार रुपये प्रति दिवस देण्याचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी नागपुरात आणले होते. तिला त्याने रामनगरातील आपल्या फ्लॅटवर मुक्कामी ठेवले होते. मागणीनुसार, तो तिला विविध ठिकाणी पाठवत होता. त्याच्याकडे ४० ते ५० वारांगना आणि शेकडो ग्राहकांचे पत्ते व मोबाईल नंबर असल्याचे पोलीस निरीक्षक पवार सांगतात. तो गेल्या अनेक वर्षांपासून या धंद्यात सक्रिय असून, महिन्याला तो २५ ते ३० लाख रुपये मिळवतो, असेही पोलिसांना कळले आहे. कमाल चौकात राहाणाऱ्या सचिनने नागपुरात विविध भागात तीन पॉश सदनिका घेतल्याचेही तपासात उघड झाले आहे. त्यांच्याकडून या कामासाठी वापरण्यात येणारी इंडिगो कार पोलिसांनी जप्त केली.