शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘सेटिंगबाज’ परिमलची देशातील विविध शहरात ‘लिंक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लाखो रुपयांच्या मोबदल्यात नीट परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी डमी उमेदवार उभे करण्याच्या देशपातळीवरील रॅकेटचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लाखो रुपयांच्या मोबदल्यात नीट परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी डमी उमेदवार उभे करण्याच्या देशपातळीवरील रॅकेटचे धागेदोरे नागपुरात सापडल्याने ‘कोचिंग क्लास’ जगताला हादरा बसला आहे. आर. के. एज्युकेशनचा संचालक परिमल कोतपल्लीवार याची नवी दिल्लीसह देशातील विविध शहरांत ‘लिंक’ होती. पालकांना जाळ्यात ओढण्यासाठी विविध ठिकाणी ‘एजंट्स’देखील नेमले होते. विशेष म्हणजे परिमल हा वैद्यकीय प्रवेशाच्या ‘रॅकेट’मध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय होता व त्याला २०१५ मध्ये अटकदेखील झाली होती, अशी माहिती सूत्रांनी लोकमतला दिली आहे.

आर.के.एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून परिमल व त्याचे एजंट्स देशातील विविध शहरांतील पालकांशी संपर्क करायचे. मोठमोठ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचे आमिष देऊन ते त्यांना जाळ्यात ओढायचे. परीक्षेसाठी ‘डमी’ उमेदवारदेखील देशातील वेगवेगळ्या भागातून तयार केले जायचे. या संस्थेचे एक कार्यालय नवी दिल्ली येथील नेहरू पॅलेस मेट्रो स्थानकाजवळ होते. विशेष म्हणजे पालकांकडून विद्यार्थ्यांचा ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ घेऊन ‘डमी’ उमेदवारांच्या सोयीच्या शहरातच परीक्षा केंद्राचा पर्याय दिला जायचा.

‘सेटिंग’मधून अनेकांचे प्रवेश

‘नीट’चा हा महाघोटाळा केवळ याच वर्षीचा नसून मागील काही वर्षांपासून परिमल या कामात होता. आर.के.एज्युकेशनच्या माध्यमातून २०२० सालच्या ‘नीट’मध्येदेखील याच पद्धतीने पालकांना संपर्क करण्यात आला होता. परीक्षा देण्यापासून ते प्रवेश करून देण्यापर्यंतच्या पूर्ण ‘सेटिंग’चा या ‘रॅकेट’मध्ये समावेश होता. त्यामुळे अशा पद्धतीने परीक्षा देऊन देशात नेमक्या किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे याची चाचपणीदेखील सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

सहा वर्षांअगोदर ‘हायटेक कॉपी’मध्येदेखील होता सहभागी

या ‘रॅकेट’चा सूत्रधार परिमल कोतपल्लीवार हा मूळचा नागपूरचाच असून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकारांमध्ये तो अनेक वर्षांपासून लिप्त आहे. २०१५ साली ‘एआयपीएमटी’ परीक्षेत अत्याधुनिक ‘गॅजेट्स’चा वापर करून ‘कॉपी’ करण्याच्या प्रकाराने देशभरातील शिक्षण वर्तुळाला हादरा बसला होता. त्या ‘रॅकेट’मध्येदेखील परिमल सहभागी होता. विद्यार्थी ‘मायक्रो स्पीकर्स’ ‘नॅनो इअर फोन्स’, ‘आयवॉच स्कॅनर’ इत्यादींच्या माध्यमातून विद्यार्थी बाहेर प्रश्न पाठवत होते व हरयाणाच्या बहरोद येथून त्यांना उत्तरे सांगण्यात येत होती. परिमलने तेव्हा प्रतिविद्यार्थी १७ लाख रुपयांच्या ‘डील’वर शहरातीलच सात विद्यार्थ्यांशी ‘डील’ केली होती. ग्रेट नाग रोडवर त्याने याच कामासाठी कार्यालयदेखील स्थापन केले होते. हरयाणा पोलिसांच्या ‘एसआयटी’ने या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली होती व तत्कालीन डीएसपी अमित भाटिया यांच्या नेतृत्वातील चमूने परिमलला ६ मे २०१५ रोजी अटक केली होती.