शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात कोरोनाची गंभीर स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:08 IST

नागपूर : विदर्भात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रुग्णसंख्येचा चढता आलेख खाली येण्याचे नाव घेत नाही आहे. गुरुवारी ...

नागपूर : विदर्भात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रुग्णसंख्येचा चढता आलेख खाली येण्याचे नाव घेत नाही आहे. गुरुवारी दैनंदिन रुग्णांची संख्या ६,७६२ झाली तर, ७४ रुग्णांचे बळी गेले. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात नागपूरसह आता वर्धा, चंद्रपूर व भंडाऱ्यात रुग्ण वाढू लागले आहेत. तर, अमरावती विभागात बुलढाणा जिल्ह्यात झपाट्याने रुग्ण वाढत असून चार जिल्ह्यात रुग्णसंख्या ३०० ते ४५० दरम्यान दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात ३५७९ नव्या बाधितांची भर पडली तर या वर्षातील सर्वाधिक ४७ रुग्णांचे मृत्यू झाले. बुलढाणा जिल्ह्यात ७७३ रुग्ण व ५ रुग्णांचे बळी गेले. अमरावती जिल्ह्यात ४३९ रुग्ण आढळून आले असून ५ रुग्णांचे मृत्यू झाले. अकोला जिल्ह्यातही ४३९ नव्या रुग्णांची भर पडली तर १ रुग्णाचा जीव गेला. अमरावती जिल्ह्यात ३४२ रुग्ण व ६ मृत्यू, वाशिम जिल्ह्यात ३०६ रुग्ण व ४ बळी, वर्धा जिल्ह्यात २५१ रुग्ण व ४ मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यात २४५ रुग्ण व २ मृत्यू, भंडारा जिल्ह्यात २४४ रुग्ण, गोंदिया जिल्ह्यात ८८ तर गडचिरोली जिल्ह्यात ५६ रुग्णांची नोंद झाली.

जिल्हा : रुग्ण : ए.रुग्ण : मृत्यू

नागपूर : ३५७९ : २०७०६७: ४७

गोंदिया :८८: १५३३० : ००

भंडारा :२४४ : १५८६५ : ००

चंद्रपूर :२४५: २६४८९:०२

वर्धा : २५१ : १७४८७: ०४

गडचिरोली :५६ : १०३२८ : ००

अमरावती : ३४२ : ४६९९७ : ०६

यवतमाळ :४३९ : २६२७५: ०५

वाशिम :३०६ : १३९९४: ०४

बुलढाणा :७७३ : ३३१०२: ०५

अकोला : ४३९: २५९५३ : ०१