शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांत महिलेची सौदी अरेबियात विक्री

By admin | Updated: May 4, 2017 02:10 IST

चांगली नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेची दोन लाखांत सौदी अरेबियात विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

वेतनाऐवजी मिळाल्या यातना : अत्याचार करण्याचा प्रयत्न नागपूर : चांगली नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेची दोन लाखांत सौदी अरेबियात विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. चार महिने काम करून वेतनाऐवजी यातना मिळाल्याने या महिलेने तेथून पळ काढून भारतीय राजदुताच्या मदतीने नागपुरात पोहोचली. तिने सक्करदरा पोलिसात याबाबत तक्रार नोंदविली. रईसा नवाब अली खान (४०) असे पीडित महिलेचे नाव आहे. रईसाची ओळख काही दिवसांपूर्वी बस प्रवासात अकिला बेगम हिच्याशी झाली. तिने रईसाला सौदी अरेबियात २० हजारांची नोकरी, राहणे आणि भोजन नि:शुल्क असल्याचे सांगितले. रईसाने तिच्यावर विश्वास ठेवला. औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ती रईसाला १५ आॅगस्ट २०१६ ला मुंबईला घेऊन गेली. तेथे तिने रईसाची भेट अब्दुल्ला याच्याशी करून दिली. त्याने अकिलाचे काम होईल, असा विश्वास दाखविला. अकिलाने रईसाला कायम नोकरी मिळाल्याची बतावणी केली. दोघीही नागपुरात आल्या. ५ सप्टेबर २०१६ रोजी अकिला पुन्हा रईसाला घेऊन मुंबईला गेली. अब्दुल्लाने रईसाचे तिकीट जयपूरवरून असल्याचे सांगितल्याने दोघीही मुंबईवरून रेल्वेने जयपूरला पोहोचल्या. जयपूरला दोन दिवस हॉटेलमध्ये थांबल्यानंतर ९ सप्टेबरला तिने रईसाला जयपूर विमानतळावर सोडले. जयपूरवरून रईसा शारजाहला पोहोचली. तेथून दुबई मार्गे रियादला गेली. तेथे आसमा नावाच्या महिलेचा भाऊ खालिद आणि हमद तिला घरी घेऊन गेले. तेथे तिला सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत काम करून मुलांना सांभाळावे लागत होते. महिनाभरानंतर तिने वेतनाची मागणी केली असता त्यांनी मुंबईच्या अब्दुल्लाकडून दोन लाखात तिला खरेदी केल्याचे सांगितले. आसमाने रईसाला दोन वर्षे काम करण्याचे किंवा दोन लाख देण्यास सांगितले. त्यानंतर आसमा आणि तिच्या भावांनी रईसाला मारहाण सुरू केली. रईसा पळून जाईल या शंकेमुळे त्यांनी तिचा पासपोर्ट आणि कागदपत्रे हिसकावली. आसमाचा भाऊ खालिदने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. आसमाकडे तीन महिने काम केल्यानंतर रईसा तेथून पळाली. एका दुकानदाराच्या साह्याने ती भारतीय राजदुताच्या कार्यालयामार्फत हैदराबादला पोहोचली. तेथून विनातिकीट नागपुरात आली. याबाबत तिने सक्करदरा पोलिसात तक्रार नोंदविली असून त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याची तक्रार तिने पोलीस आयुक्तांना केली आहे. निर्भया सुरक्षा अभियान योजनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गुरव यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय टोळीचा संबंध अकिलाचा मानव तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याची शंका आहे. अकिलाने विदेशात नोकरीचे आमिष दाखवून यातना दिल्याचे प्रकरण यापूर्वीही उजेडात आले आहे. तीन वर्षापूर्वी मोटार मेकॅनिकचे काम करणाऱ्या तिघांना तिने फसविले होते. परंतु विदेशात गेल्यानंतर त्यांना अकिलाची कोणतीही मदत झाली नाही. बेरोजगारी आणि अधिक वेतन यामुळे अनेकजण सहज अकिलाच्या फसवणुकीला बळी पडतात. अनेक महिलांची फसवणूक रईसाच्या धर्तीवर शहरातील अनेक महिलांचीही अशीच विक्री झाल्याची माहिती आहे. त्या तेथून यातना भोगून परतल्या. यातील अनेक महिला एका विशिष्ट वर्गाच्या असून बदनामीच्या भीतीने त्या तक्रार दाखल करीत नाहीत. यामुळेच आरोपींचा खरा चेहरा समोर येऊ शकला नाही.