शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील झाडे विकून रक्कम हडपली

By admin | Updated: July 28, 2014 01:29 IST

शाळेच्या परिसरात असलेली मोठमोठी झाडे अवैधरीत्या तोडून लाकडांची परस्पर विक्री केल्याचा प्रकार कामठी तालुक्यातील वारेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत नुकताच उघडकीस आला.

मुख्याध्यापिकेचा प्रताप : वारेगावच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील प्रकार सुदाम राखडे - कामठीशाळेच्या परिसरात असलेली मोठमोठी झाडे अवैधरीत्या तोडून लाकडांची परस्पर विक्री केल्याचा प्रकार कामठी तालुक्यातील वारेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत नुकताच उघडकीस आला. या प्रकरणात मुख्याध्यापिका सुवर्णा सुनील भगत यांनी लाकूड विक्रीतून मिळालेली रक्कम हडप केल्याची माहिती सूत्रांनी दिली.वारेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला कामठी येथील केशरताई भारुका यांनी त्यांच्या मालकीची ११ एकर जमीन १९६५ मध्ये दान दिली. तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब केदार यांनी या जमिनीची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करून ही जमीन या शाळेच्या नावे करवून दिली. यातील काही जमिनीवर शाळेच्या प्रशस्त इमारतीचे बांधकाम करण्यात आले. काही जमीन मोकळी असल्याने त्यावर अंदाजे २५ वर्षांपूर्वी स्थानिक ग्रामस्थांनी सागवान, बेहडा, रिठा यासह अन्य झाडांच्या रोपट्यांची लागवड करून त्यांचे संगोपनही केले. ही झाडे आता मोठी झाली. यातून वाचलेली काही जमीन स्थानिक शेतकऱ्यांना ५,५०० रुपयांप्रमाणे भाडेपट्टीने देण्यात आली. वारेगाव येथील एका सूज्ञ नागरिकाने या गंभीर प्रकाराची तक्रार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्याकडे केली. सुवर्णा भगत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या वृक्षतोडीबाबत विचारणा केली असता, त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. हा संपूर्ण प्रकार मुख्याध्यापिकेने तिच्या मनमर्जीने केला असून, झाडे तोडण्याची पूर्वसूचना स्थानिक ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती अथवा शिक्षण, वन व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना दिली नाही. त्यामुळे या प्रकरणाची निरपेक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.