शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘सेल्फी’ स्वत:च्या उणिवाही दाखवतो

By admin | Updated: October 25, 2015 02:48 IST

सेल्फीचे सध्या फारच वेड आहे. पण सेल्फी हे नाटक मात्र केवळ एका छायाचित्रावर आधारित नसून संपूर्ण आयुष्याचे सिंहावलोकन करणारे आणि महिलांना विचार देणारे नाटक आहे.

सेल्फी नाटकाच्या पाच अभिनेत्रींशी लोकमत सखी मंच सदस्यांचा मनमोकळा संवादनागपूर : सेल्फीचे सध्या फारच वेड आहे. पण सेल्फी हे नाटक मात्र केवळ एका छायाचित्रावर आधारित नसून संपूर्ण आयुष्याचे सिंहावलोकन करणारे आणि महिलांना विचार देणारे नाटक आहे. मुळात आयुष्याच्या धावपळीत आपल्याला आवडते तसे जगायला मिळतच नाही. आपल्या कला, गुणांचा विसर पडतो आणि आपण परिस्थितीला शरण जातो. पण अनेकदा एखाद्या टप्प्यावर आपल्याच उणिवा आपल्याला कळतात आणि त्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न केल्यावर प्रगतीची नवी दालनेही खुली होऊ शकतात. त्यामुळेच नाटकातला सेल्फी स्वत:च्या सौंदर्यासह उणिवाही दाखवतो, असे मत या नाटकातील पाच नायिकांनी लोकमत सखी मंचच्या सदस्यांशी संवाद साधताना व्यक्त केले. लोकमत सखी मंचच्यावतीने सखी मंच सदस्यांना ‘सेल्फी’ नाटकातील कलावंतांशी संवाद साधण्याची संधी देण्यात आली. हा कार्यक्रम विष्णुजी की रसोई येथे शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यात अभिनेत्री सुकन्या कुळकर्णी, सोनाली पंडित, ऋतुजा देशमुख, शिल्पा नवलकर आणि पूर्वा गोखले यांनी सखींशी संवाद साधला. याप्रसंगी सखींनी अभिनेत्रींना त्यांचे करियर, खाजगी जीवन, त्यांचे चित्रपट आणि मालिका आदींबाबत माहिती विचारली. या सर्व अभिनेत्री शनिवारी ‘सेल्फी’ या नाटकाच्या प्रयोगासाठी नागपुरात आल्या होत्या. डॉ. देशपांडे सभागृहात या नाटकाचे तीन प्रयोग आयोजित करण्यात आले आहे. नाटकाचे निर्माता आणि दिग्दर्शक अजित भुरे यांनीही यावेळी सखींशी संवाद साधला. सेल्फी अर्थात स्वत:चा विचार करणे. नाटकात साधारण पस्तीशीच्या वयोगटातील एकमेकींना न ओळखणाऱ्या महिला काही कारणाने एकत्रित येतात आणि त्यांच्यात संवाद सुरू होतो.या संवादातून प्रत्येकीच्या आयुष्यातील उणिवा समोर येतात आणि त्याची उत्तरेही नकळतपणे मिळतात. याप्रसंगी सखींचे स्वागत प्रफुल्ल मनोहर यांनी केले. संचालन नेहा जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)