शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बाळाला बघताच आईच्या डोळ्यात आले आनंदाश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:39 IST

तीन वर्षांचा बालक रेल्वेस्थानकावर खेळता-खेळता आईवडिलांपासून दूर गेला. त्याला शोधण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी रेल्वेस्थानक पिंजुन काढले. परंतु तो कुठेच आढळला नाही. रडवेल्या चेहऱ्याने त्याची आई इकडेतिकडे त्याचा शोध घेत होती. अखेर कुली अन् ऑटोचालकांनी तो सुखरूप असल्याची अनाऊन्समेंट केल्यानंतर तिने आरपीएफ ठाणे गाठले. बाळाला बघताच आईच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली अन् ती आपल्या बाळाला घट्ट बिलगली.

ठळक मुद्देनागपूर रेल्वेस्थानकावर हरविला : कुली, ऑटोचालकांमुळे मिळाला सुखरूप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन वर्षांचा बालक रेल्वेस्थानकावर खेळता-खेळता आईवडिलांपासून दूर गेला. त्याला शोधण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी रेल्वेस्थानक पिंजुन काढले. परंतु तो कुठेच आढळला नाही. रडवेल्या चेहऱ्याने त्याची आई इकडेतिकडे त्याचा शोध घेत होती. अखेर कुली अन् ऑटोचालकांनी तो सुखरूप असल्याची अनाऊन्समेंट केल्यानंतर तिने आरपीएफ ठाणे गाठले. बाळाला बघताच आईच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली अन् ती आपल्या बाळाला घट्ट बिलगली.अली हुसेन (३) असे त्या बालकाचे नाव. वडील मोहम्मद कय्युम (३३) आणि आई मदिना (३०) हे मूळचे पाटण्याचे असून कामाच्या शोधात बुटीबोरी येथील मोहगावला आले. काम संपल्यामुळे ते गावाकडे परत जाण्यासाठी बुधवारी सकाळी ७.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आले. ते प्लॅटफार्म क्रमांक १ वर गाडीची वाट पाहत बसले होते. थोड्या वेळानंतर त्यांना आपले बाळ जवळ नसल्याचे लक्षात आले. त्याला सर्वत्र शोधले पण तो कुठेच आढळला नाही. रेल्वेस्थानकाच्या बाहेर कुली संघटनेचे अध्यक्ष अब्दुल माजिद शेख आणि ऑटो संघटनेचे सहसचिव अल्ताफ शेख हे प्रवासी मिळण्याची वाट पाहत बसले होते. त्यांना एक तीन वर्षांचा चिमुकला प्री पेड बुथजवळ दिसला. त्यांनी या बाळावर लक्ष ठेवले. तो बालक खेळत इकडे तिकडे फिरत होता. २० मिनिटानंतर तो प्लॅटफार्म क्रमांक १ वर गेला. तेथेही त्याचे नातेवाईक नसल्यामुळे तो आईवडिलांपासून दूर गेल्याची जाणीव त्यांना झाली. लगेच त्यांनी बाळाला जवळ घेतले. परंतु काहीच बोलत नसल्यामुळे लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाला कळविले. उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयातून अनाऊ न्समेंट केली. त्यानंतर या बाळाला रेल्वे चाईल्ड लाईनकडे सोपविण्यात आले. तर अनाऊन्समेंट ऐकल्यानंतर त्या बाळाचे आईवडील आले. आईने आपले बाळ दिसताच त्यास मिठी मारून आपल्या डोळ्यातील आसवांना वाट मोकळी करून दिली. हरविलेले बाळ त्यांचेच असल्याची खात्री पटल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक बघेल यांनी त्या बाळास आईवडिलांच्या स्वाधीन केले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरMissingबेपत्ता होणं