शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अंथरूण पाहून पाय पसरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड-१९ मुळे महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. मागील दोन वर्षापासून प्रभागातील विकास कामे ठप्प ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड-१९ मुळे महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. मागील दोन वर्षापासून प्रभागातील विकास कामे ठप्प आहेत. याचा विचार करता मनपाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाईल. अंथरूण पाहून पाय पसरावे लागतील. मनपा आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर केल्यानतंर महिनाभरात स्थायी समितीचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी सोमवारी पदभार स्वीकारल्यानंतर दिली.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, माजी आमदार अनिल सोले, मावळते अध्यक्ष विजय झलके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांशी चर्चा करताना भोयर म्हणाले, पुढील वर्ष निवडणुकीचे असल्याने आव्हानात्मक आहे. लोकहिताची कामे करावी लागतील. यासाठी सर्वांना सोबत घेऊन विकास कामे केली जाईल. सर्व वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. वर्ष १९८७-८८ भाजपचा कार्यकर्ता होतो. २०१७ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झालो. पक्षाने जबाबदारी सोपविली. ती पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.

...

जनहिताचे प्रकल्प प्रशासनाने रोखले : झलके

विजय झलके म्हणाले, ६ मार्च २०२० रोजी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. २२ मार्चला जनता कर्फ्यू लागला. त्यानंतर सर्व कालावधी कोविड संक्रमणात गेला. विकास कामे अपेक्षित गतीने झाली नाही. प्रथमच तोट्याचा अर्थसंकल्प दिला. अनेक अडचणीनंतरही २७६ कोटींची कामे करण्यात यश आले. परंतु काही जनहिताचे प्रकल्प प्रस्तावित होते. त्यावर खर्चही फारसा होणार नव्हता. दुर्दैवाने प्रशासनाने हे प्रस्ताव रोखले. यात चालता-फिरता दवाखाना, मनपाचे स्वतंत्र पोलीस स्टेशन, प्रत्येक झोनमध्ये शीतपेटी अशा उपक्रमांचा यात समावेश होता. परंतु प्रशासनाच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे या योजना अंमलात आणता आल्या नाही, अशी खंत झलके यांनी व्यक्त केली.