शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

महादुला-कोराडीत १६ एटीएमची सुरक्षा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:07 IST

दिनकर ठवळे कोराडी : महादुला कोराडी परिसरात असलेल्या १८ एटीएम पैकी १६ एटीएमला सुरक्षारक्षकांची प्रतीक्षाच आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने ...

दिनकर ठवळे

कोराडी : महादुला कोराडी परिसरात असलेल्या १८ एटीएम पैकी १६ एटीएमला सुरक्षारक्षकांची प्रतीक्षाच आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने एटीएमची सुरक्षा धोक्यात असतानाच कोविड संसर्गाच्या काळात एटीएम मध्ये अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएममध्ये कोविड निर्देशांचे पालन होताना दिसत नाहीत. हेल्मेट घालून, तोंडाला कापड गुंडाळलेली लोक एकाच वेळी एटीएम रूममध्ये प्रवेश करताना दिसतात. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना अनेकाना असुरक्षित वाटते. अलीकडच्या काळात एटीएम फोडण्याच्या घटना लक्षात घेता हे एटीएम किती सुरक्षित आहेत याचाही विचार व्हायला हवा. गणेश नगरीतील युनियन बँकेच्या एटीएम मध्ये काही दिवसापूर्वीच चोरीचा प्रयत्न झाला. तेव्हापासून या बँकेचे एटीएम बंद आहे. या परिसरात एटीएमची संख्या १८ आहे. त्यापैकी गणेश नगरीत असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमवर २४ तास ३ पाळीत तीन गार्ड असतात. पांजरा येथील पटेल पेट्रोल पंपवर असलेल्या स्टेट बँकेचे एटीएमवर रात्रपाळीत एक गार्ड असतो. इतर १६ एटीएममध्ये कोणत्याही वेळेला गार्ड राहत नाही. स्टेट बँकेच्या कोराडी कॉलनीत असणाऱ्या एटीएमजवळ रात्रपाळीत गार्ड नसतो. वीज केंद्रात स्टेट बँकेचे एटीएम आहे. कारेमोरे संकुल महादूला येथे अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम, बालाजी किराणा जवळ बँक ऑफ इंडिया एटीएम, महादूला येथे बँक ऑफ बडोदा एटीएम , महादूला बाजारात इंडसेंट यांचे एटीएम, महाराष्ट्र बँकेचे एटीएम, बाजार चौक कोराडी येथे इंडिकॅश एटीएम, संघदीप बुद्धविहार महादुला येथे हिताची एटीएम, कंभाले टॉवर येथे बँक ऑफ बडोदा एटीएम, महादुला टी पॉईंट जवळ एचडीएफसीचे एटीएम, गणेश नगरी येथे युनियन बँक एटीएम, कोराडी नाका येथे एचडीएफसी बँकेचे एटीएम, विद्यानगर मॉडल स्कूल येथे कॅनरा बँकेचे एटीएम तर याच एरियात शेर-ए-पंजाब जवळ हिताची मणिपोस्टचे एटीएम आहे. या एकूण अठरा एटीएमपैकी सोळा एटीएमवर कोणत्याही वेळेला गार्ड नसतो. याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गार्ड नेमण्यात यावा अशा प्रकारचे पत्रही पोलीस यंत्रणेने संबंधित बँकेच्या व्यवस्थापकांना दिले आहे.

बँकेतही गार्ड नाही

या परिसरात ११ बँक आहेत वीज वसाहतीत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये केवळ कार्यालयीन वेळेत सुरक्षा रक्षक आहे. तिरुपती अर्बन को-ऑप बँक पांजरा येथे कार्यालयीन वेळेत गार्ड तर दोन बँकेत मध्ये मात्र २४ तास गार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर नागरिक सहकारी को-ऑपरेटिव्ह बँक कोराडी व आयसीआयसीआय बँक गणेश नगरी यांचा समावेश आहे. उर्वरित सात बँकांमध्ये कोणत्याही पाळीत गार्ड नसतो. ज्यामध्ये महादुला येथील बँक ऑफ महाराष्ट्र, विशाल नागरी सहकारी पतसंस्था, इसाप स्मॉल फायनान्स बँक कोराडी, बँक ऑफ बडोदा महादुला, युनियन बँक गणेश नगरी, इंडसइंड बँक गणेश नगरी व सिंडिकेट बँक विद्यानगर बोखारा यांचा समावेश आहे. या बँकांमध्ये ही सुरक्षारक्षक नेमावा असे संबंधितांना वारंवार सुचवण्यात आले आहे. एटीएम व्यवस्थापकांनी आपल्या एटीएमवर किमान रात्रपाळी तरी गार्ड नेमावा, अशी मागणी नागरिकांची आहे