शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांचे ४३ टक्के बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:07 IST

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात मागील २१ ...

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात मागील २१ दिवसात २८३ रुग्णांचे बळी गेले. यात ४३.८१ टक्के मृत्यू हे ६० वर्षांवरील ज्येष्ठांचे आहेत. मेयोमध्ये ४७ तर मेडिकलमध्ये ७७ असे एकूण १२४ ज्येष्ठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे ज्येष्ठांची अधिक काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

युरोपमध्ये दुसरी लाट विनाशकारी ठरली आहे. मार्च महिन्यापासून दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याचा प्रभाव दिसून येऊ लागला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून दैनंदिन रुग्णसंख्येत हजार, दुसऱ्या आठवड्यापासून दोन हजार तर तिसऱ्या आठवड्यापासून तीन हजाराने रुग्ण वाढून आता रुग्णसंख्या साडेतीन हजारांवर गेली आहे. मृत्यूची संख्या पहिल्या आठवड्यात १०च्या आत होती. दुसऱ्या आठवड्यात ती वाढून १५ पर्यंत गेली. तिसऱ्या आठवड्यात ३५ पर्यंत गेली. २२ मार्च रोजी या वर्षातील सर्वाधिक ४० मृत्यूची नोंद झाली.

-१४७ रुग्णांच्या मृत्यूमागे ‘को-मॉर्बिडिटीज’

मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्या १५७ पैकी १४७ (९३.६३ टक्के) कोरोनाबाधितांना अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड, यकृताचा आजार, कर्करोग आदी ‘को-मॉर्बिडिटीज’असल्याचे समोर आले आहे. हे गंभीर आजार माहीत नसलेल्या मृत्यूची संख्या १० होती.

-लक्षणे दिसताच चाचणी करा, उपचार घ्या

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यास किंवा लक्षणे दिसताच चाचणी करा. पॉझिटिव्ह आल्यास डॉक्टरांनी सांगितल्यानुसार उपचार घ्या. लक्षणे असल्यास ६० वर्षांवरील वय असल्यास किंवा ‘को-मॉर्बिडिटीज’ असल्यास रुग्णालयात भरती व्हा. उपचारात डॉक्टरांना मदत करा. स्वत:हून औषधी घेणे टाळा.

-डॉ. प्रशांत पाटील

प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग

::मेयो, मेडिकलमधील २४७ मृतांमधील वयोगट

वयोगट : मृत्यू

२० व त्याखालील : ०६

२१ ते ३० : ०७

३१ ते ४० : १९

४१ ते ५० : ३८

५१ ते ६० : ५३

६१ ते ७० : ५८

७० व त्यापुढील : ६६

::शहर व ग्रामीणमधील मृत्यू

शहरातील : १६२

ग्रामीणमधील : ५४

जिल्ह्याबाहेरील : ३१