शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘आर्ची’साठी चाहते सैराट

By admin | Updated: September 17, 2016 03:08 IST

महाराष्ट्रच नव्हे तर देशभराला आपल्या अभिनयाने वेड लावणाऱ्या सैराट चित्रपटातील नायिका ‘आर्ची’ म्हणजेच रिंकू राजगुरू हिने

रिंकू राजगुरूची हिलटॉपच्या गणेशाला भेट : नागपूरकरांनी केली गर्दी नागपूर : महाराष्ट्रच नव्हे तर देशभराला आपल्या अभिनयाने वेड लावणाऱ्या सैराट चित्रपटातील नायिका ‘आर्ची’ म्हणजेच रिंकू राजगुरू हिने शुक्रवारी नागपूरकरांनाही वेड लावले. हिलटॉपचा राजा या गणपतीला भेट देण्यासाठी ती आली हेती. यावेळी नागपूरकर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. आर्चीला एक झलक पाहण्यासाठी चाहते ‘सैराट’ झाले. तिने चाहत्यांकडे पाहताच आणि स्माईल देताच चाहत्यांनी झिंगाट केला. एकता गणेश उत्सव मंडळाच्या हिलटॉपचा राजा गणपतीच्या भेटीसाठी रिंकू राजगुरू दुपारी १२.३० वाजता येणार होती. नागपुरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सकाळी ११.३० वाजेपासूनच लोकांनी हिलटॉपमध्ये गर्दी करायला सुरुवात केली होती. दूरवरूनही लोक मोठ्या संख्येने आले होते. हिलटॉप परिसरातील लोक आपापल्या घरावरून, गच्चीवरून मिळेल त्या ठिकाणी वाट पाहात उभे होते. रिंकू राजगुरू हिची लोकप्रियता बघता पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासोबतच आयोजक असलेल्या गणेश मंडळाचे स्वयंसेवकसुद्धा मोठ्या प्रमाणावर पोलिसांच्या सहकार्यासाठी होते. दुपारी १.३० वाजता आर्चीला घेऊन आ. प्रकाश गजभिये आले. परंतु लोकांची गर्दी इतकी होती की, आर्चीला गाडीतून उतरण्यासाठी तब्बल १५ मिनिटे लागली. तेव्हापर्यंत स्वयंसेवक, पोलीस आणि स्वत: आमदार गजभिये यांनी गर्दीला दूर करण्याचा प्रयत्न केला. आर्चीच्या हातून आरती करण्यात आली. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्य स्टेजकडे नेण्यात आले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागपूरकर चाहते आर्चीची प्रतीक्षा करीत होते. ती व्यासपीठावर येताच चाहते आर्ची-आर्ची म्हणून ओरडू लागले. माजी मंत्री अनिल देशमुख, आ. प्रकाश गजभिये यांनी रिंंकू राजगुरू हिचा नागपूरकरांच्यावतीने सत्कार केला. यावेळी रिंकूचे वडील महादेव राजगुरू उपस्थित होते. (प्रतिनिधी)ट्रान्सफॉर्मरवर चढलेल्या युवकाला लागला शॉक आर्चीला एक नजर पाहण्यासाठी चाहत्यांची पळापळ सुरू होती. स्टेज दूर असल्याने तिला व्यवस्थित पाहता यावे, म्हणून कुणी इमारतीवर, बालकनीत तर कुणी भिंतीवर चढले होते. काही मुले कम्पाऊंड वॉलच्या भिंतीवर चढली. त्याच्या बाजूलाच असलेल्या ट्रान्सफॉर्मरला पकडून काही मुले उभी होती. यात अक्षय नावाच्या मुलाला जोरदार करंट बसला व तो ट्रान्सफॉर्मरला चिकटला. त्याच्यासोबतची इतर मुले पळाली. एका वृद्ध व्यक्तीने इमारतीवरून पोलिसांना मुलाला करंट लागल्याचा इशारा केला. पोलिसांनी धावपळ केली. धंतोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजन माने व त्यांच्या पथकाने तत्परता दाखवित त्या मुलाला काठीच्या मदतीने दूर केले. यात आक्षयचा हात भाजला गेला. त्याला लगेच उपचारासाठी रवाना करण्यात आले. दोन कारचेही नुकसान आर्चीला पाहण्यासाठी अनेक चाहते कारवर सुद्धा चढले. चाहत्यांच्या वजनामुळे दोन कारचे चांगलेच नुकसान झाले. नागपूरकरांचे आभार यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू हिने हात उंचावून सर्व चाहत्यांचे, नागपूरकरांचे आभार मानले.