शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

‘एसडीओ’ला जातवैधता तपासण्याचे अधिकार नाहीत

By admin | Updated: December 27, 2014 03:00 IST

कायद्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी अर्जदाराकडून किमान आवश्यकता पूर्ण केल्या जात आहेत किंवा नाही हे पाहणे व समाधान झाल्यानंतर जात प्रमाणपत्र देणे अपेक्षित आहे.

कायद्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी अर्जदाराकडून किमान आवश्यकता पूर्ण केल्या जात आहेत किंवा नाही हे पाहणे व समाधान झाल्यानंतर जात प्रमाणपत्र देणे अपेक्षित आहे. जात प्रमाणपत्राच्या दाव्याची प्रामाणिकता तपासताना ते जात पडताळणी समितीच्या अधिकारक्षेत्रात प्रवेश करू शकत नाही. कायद्याच्या कलम २ (के) अनुसार जात प्रमाणपत्राची सत्यता तपासण्याचे अधिकार जात पडताळणी समितीला आहेत. उपविभागीय अधिकारी केवळ जात प्रमाणपत्र देऊ शकतात. उपविभागीय अधिकाऱ्याने जात प्रमाणपत्र दिल्याशिवाय जातीची वैधता तपासण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे प्रमाणपत्र जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्येही फरक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदविले आहे. दासरखेड (ता. मलकापूर) येथील नामदेव इंगळे यांच्यासह एकूण सहा जणांनी दाखल केलेली रिट याचिका निकाली काढताना न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व पुखराज बोरा यांनी हा निर्णय दिला. मलकापूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक याचिकाकर्त्यासंदर्भात लांबलचक आदेश करून ठाकूर जातीचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. समितीचे वादग्रस्त आदेश रद्द नागपूर : उच्च न्यायालयाचे निर्णय व चालीरीती चाचणीच्या आवश्यकतेवरही आदेशात प्रकाश टाकण्यात आला होता. याविरुद्ध याचिकाकर्त्यांनी अमरावती विभागीय अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केलेले अपीलसुद्धा फेटाळण्यात आले होते. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारताना वरीलप्रमाणे निर्णय देऊन उपविभागीय अधिकारी व जात पडताळणी समितीचे वादग्रस्त आदेश रद्द केलेत. अ‍ॅड. अमित बालपांडे यांनी याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडली....तर पडताळणी समितीची स्थापना व्यर्थउपविभागीय अधिकाऱ्यांनी जातीच्या वैधतेवर निर्णय देणे सुरू केल्यास जात पडताळणी समितीची स्थापना व समितीचे जात प्रमाणपत्राची वैधता तपासण्याचे अधिकार व्यर्थ आहेत असे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. जात प्रमाणपत्राची वैधता तपासण्यासाठी कायद्याच्या कलम ६ अंतर्गत जात पडताळणी समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीमध्ये विविध सदस्य व तज्ज्ञांचा समावेश असतो. समितीचा व्हिजिलन्स सेल चालीरीती व इतर चौकशीचे कार्य करतो. समितीने विविध तपशील व सर्व प्रकारचे कांगोरे तपासून जात वैधता प्रमाणपत्र देणे कायद्याला अपेक्षित आहे. समितीचा निर्णय अंतिम स्वरुपाचा असतो. निर्णयाला दिवाणी न्यायालयात आव्हान देता येत नाही. कायद्याच्या कलम ४ मध्ये उपविभागीय अधिकारी हे जात प्रमाणपत्र देताना दाव्याच्या प्रामाणिकतेबाबत स्वत: समाधानी होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, उपविभागीय अधिकारी प्रामाणिकतेच्या नावाखाली जात वैधतेवरही निर्णय देत असतील तर ही कृती कायद्याच्या विरोधात होईल, असे न्यायालयाने नमूद केले आहे. (प्रतिनिधी)