शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अधिकाराला कात्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 11:32 IST

राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने अधिसूचना जारी करून महापालिकेच्या स्थायी समितीच्या अधिकाराला कात्री लावली आहे.

ठळक मुद्देआयुक्तांचे अधिकार वाढलेराज्य सरकारची अधिसूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने अधिसूचना जारी करून महापालिकेच्या स्थायी समितीच्या अधिकाराला कात्री लावली आहे. ११ सप्टेंबरला जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार शासकीय निधीतून होणाऱ्या १०० कोटीहून अधिक खर्चाचे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहे. यात डीपीसी निधी, आमदार व खासदार निधी, मुख्यमंत्री निधी आदींचा समावेश आहे. सध्या शासकीय निधीतील विकास कामांच्या फाईल मंजुरीचे अधिकार स्थायी समितीला आहे.मात्र महापालिकेच्या निधीतील २५ लाखांहून अधिक रकमेच्या निविदा मंजुरीचे अधिकार स्थायी समितीकडे कायम आहे. महापालिकेला प्राप्त होणाºया विशेष निधीतील विकास कामांच्या फाईलला स्थायी समितीची मंजुरी घ्यावी लागेल. कारण हा निधी महापालिकेला मिळालेला असतो.विशेष म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (१९५९ च्या ५९) च्या कलम ७३(क) अंतर्गत प्रदान करण्यात आलेले अधिकार व अन्य अधिकारांचा वापर करून राज्य सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे. महापालिकेची बिक ट आर्थिक परिस्थिती असल्याने सध्या स्थायी समितीकडे मंजुरीसाठी येणाºया प्रस्तावात ५० टक्के प्रस्ताव शासकीय निधीतील विकास कामांचे असतात. शासनाच्या अधिसूचनेमुळे स्थायी समितीकडे मंजुरीसाठी येणाºया प्रस्तावांची संख्या कमी होणार आहे.

तासाभरात १८२ कोटींचे प्रस्ताव मंजूरविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने स्थायी समितीत फाईल मंजुरीची जणू स्पर्धाच लागली आहे. बुधवारी समितीच्या बैठकीत तासाभरात अंतरात दोन बैठकी घेऊ न १८२.६३ कोटींच्या प्रस्तांना मंजुरी देण्यात आली. गुरुवारी पुन्हा स्थायी समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

नाईक तलावाचे पुनर्जीवन करण्याला मंजुरीराष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (नीरी) नाईक तलावाचे पुनर्जीवन व सौंदर्यीकरणासाठी सज्ज झाली आहे. या प्रकल्पावर ५.५७ कोटींचा खर्च होणार आहे. नीरी पाच वर्षापर्यंत तलावाची देखभाल करणार आहे. फायटोराईड तंत्राने तलावाचे पुनर्जीवन करणार आहे. यामुळे लवकरच नाईक तलावाचा कायापालट होणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका