शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

गणवेशासाठी शाळकरी मुलीची आत्महत्या

By admin | Updated: July 14, 2016 02:50 IST

वर्गातील इतर मुलींजवळ नेटका गणवेश आहे, मात्र आपल्याजवळ गणवेश नसल्याची खंत सातत्याने असल्याने...

परिस्थितीने घेतला बळी : शिक्षणापेक्षा गणवेश महत्त्वाचा का? नागपूर : वर्गातील इतर मुलींजवळ नेटका गणवेश आहे, मात्र आपल्याजवळ गणवेश नसल्याची खंत सातत्याने असल्याने नागपुरातील रविनगर येथील सी.पी.अ‍ॅण्ड बेरार शाळेच्या आठव्या वर्गातील विद्यार्थिनीने मंगळवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली. रितू गजानन ढाकुलकर असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. रितूच्या आत्महत्येने समाजमन मात्र सुन्न झाले आहे. रितूच्या वडिलांचा रविनगर चौकात पानठेला आहे. आई धुणीभांडी करते. दिवसभर घरात मोठी बहीण कांचन व लहान भाऊ चेतन असतो. शाळेचा आठव्या वर्गापासून गणवेश बदलतो. त्यामुळे नवीन गणवेश घेणे गरजेचे होते. शाळेतून तिला गणवेशासाठी विचारणा झाली. चार दिवसापूर्वी रितूने वडिलांकडे मागणी केली. परिस्थिती नसल्याने वडीलही तिला दोन-चार दिवसात गणवेश घेऊन देणार होते. वडिलांनी शिक्षकांची भेट घेऊन त्यांना कारण सांगितले होते. शिक्षकांनीच तिला आम्हीच गणवेश देऊ, असे सांगितले होते. आईला तिने शाळेतूनच गणवेश मिळणार आहे, असेही सांगितले होते. -तर रितूने आत्महत्याच केली नसती रितू हट्टी होती. टीव्ही बघण्यावरून बहिणीशी तू-तू-मै-मै करायची. शाळेतून आल्यावर आईच्या मागेच रहायची. तिची आई धुणीभांडी करण्यासाठी मंगळवारी सकाळी ७ वाजता घराबाहेर पडली. दररोज दुपारी आई घरी यायची. परंतु मंगळवारी काम जास्त असल्याने ती घरी परतलीच नाही. मी दुपारी घरी आले असते, तर रितूने आत्महत्या केली नसती, पोरगी हातची गेली, आता ती कधीच बोलणार नाही, असा टाहो तिच्या आईने फोडला.