शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

फ्री फायर गेमच्या नादी लागलेली शाळकरी मुले निघाली मुंबईकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फ्री फायर गेमच्या नादी लागलेली नागपुरातील तीन शाळकरी मुले शनिवारी भल्या सकाळी घरून निघून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : फ्री फायर गेमच्या नादी लागलेली नागपुरातील तीन शाळकरी मुले शनिवारी भल्या सकाळी घरून निघून गेली. पालक आणि पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखविल्याने मुले रेल्वेद्वारे मुंबईकडे जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आरपीएफच्या मदतीने सायंकाळी या तिघांना नाशिक रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले. पालकांच्या काळजाची धडधड वाढविणारी ही घटना शनिवारी नागपुरात घडली.

१५, १६ आणि १७ वर्षे वय असलेली ही तीनही मुले प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. ते दहावीचे विद्यार्थी आहेत. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे शाळा बंद झाल्याने ऑनलाईन क्लासच्या नावाखाली हे तिघेही आपापल्या घरी फ्री फायर ऑनलाईन गेम खेळत होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विरंगुळा म्हणून पालकांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे, या तिघांनाही व्यायामाची आवड असून, रोज भल्या सकाळी ते फिरायला जात होते. नेहमीप्रमाणे आज सकाळी बॅग घेऊन ते मॉर्निंग वाॅकला जातो म्हणून घरून निघून गेले. नऊ वाजले तरी ते घरी परत आले नाहीत. त्यामुळे तीनही मुलांच्या आई-वडिलांनी एकमेकांकडे चौकशी केली. विशेष म्हणजे, यातील एका मुलाने आपल्या आईला शुक्रवारी सायंकाळी आपण उद्या सकाळी मित्रांसोबत मुंबईला फ्री फायर गेमचे टूर्नामेंट खेळण्यासाठी जात असल्याचे सांगितले होते. आईने कुणासोबत जात आहे, अशी विचारणा केल्यानंतर सध्या क्लास आणि नंतर परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे आता जायचे नाही, परीक्षा संपल्यानंतर जा असे म्हणून त्याला गप्प केले. यावेळी त्या मुलाने ओके म्हणत आपल्या आई-वडिलांना संशय येणार नाही, याची काळजी घेतली. तो सकाळी घरून जाताना बॅगमध्ये कपडे घेऊन गेल्याचे आईच्या लक्षात आल्याने तिने मुलाच्या वडिलांना सांगितले. त्यानंतर या मुलाचे आई-वडील त्याच्या मित्राच्या घरी गेले. तेव्हा तो सुद्धा घरून मॉर्निंग वॉकच्या बहाण्याने बॅग घेऊन आणि त्यात स्वतःचे कपडे भरून गेल्याचे स्पष्ट झाले. तिसऱ्या मुलाच्या बाबतीतही असाच प्रकार घडल्याने ते पळून गेल्याचा निष्कर्ष पालकांनी काढला. त्यानंतर तिन्ही मुलांच्या पालकांनी लगेच प्रतापनगर पोलीस ठाणे गाठले. ही माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके, पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांना कळली. त्यांनी तातडीने पोलीस पथक रेल्वेस्थानकावर पाठविले.

सीसीटीव्ही फुटेजमुळे झाला खुलासा

- नागपूर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ही तीनही मुले हावडा-मुंबई स्पेशल ट्रेनमध्ये बसल्याचे दिसून आले. ही मुले मुंबईला चालली असावी, असा अंदाज बांधण्यात आला. त्यामुळे स्थानिक पोलीस, रेल्वे पोलीस, आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी अकोला, जळगाव, नाशिक आणि मुंबई रेल्वे पोलिसांना अलर्ट दिला. या मुलांचे लोकेशन्स काढल्यानंतर हे तिघे बसून असलेली रेल्वेगाडी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान नाशिकला पोहोचणार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार नाशिक स्थानकात रेल्वे गाडी थांबताच त्या तिघांना आरपीएफने ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर या तिघांना नागपूरकडे परत कसे पाठवावे, या संबंधाने विचारविमर्श सुरू होता.

----

असा आहे फ्री फायर गेम

२०१९ चा जगातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला फ्री फायर ऑनलाईन गेम एकाच वेळी ५० जण खेळू शकतात. विमान किंवा हेलिकॉप्टरमधून पॅराशूटच्या माध्यमाने बेटावर उडी घ्यायची आणि तेथे दडून असलेल्या अन्य ४९ जणांना शोधून वेगवेगळ्या शस्त्राच्या आधारे ठार मारायचे. जो एक शिल्लक राहील, तो गेमचा ''विनर'', असा हा गेम आहे.

----