शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

साडेनऊ कोटींची बनवाबनवी

By admin | Updated: December 25, 2016 02:58 IST

बनावट धनादेश बँकेत जमा करून साडेनऊ कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न बँक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे फसला.

बँक अधिकाऱ्यांची सतर्कता : चष्मा विक्रेता गजाआड नागपूर : बनावट धनादेश बँकेत जमा करून साडेनऊ कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न बँक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे फसला. ही बनवाबनवी उघड होताच अश्विन छाबरा (साबरा, बैरामजी टाऊन) नामक चष्मा विक्रेत्याला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. आॅप्टीकल शॉपचा संचालक असलेल्या अश्विनने स्टेट बँकेच्या रामदासपेठ शाखेत ९ कोटी, ५७ लाखांचा धनादेश जमा केला. हा धनादेश गुरुवारी सकाळी बँक अधिकाऱ्यांपुढे क्लिअरिंगसाठी आला. मोठ्या रकमेचा धनादेश पाहून बँक व्यवस्थापक सतीश शिवपाल सिंघानिया (रा. कांचनसागर अपार्टमेंट धंतोली) यांनी रक्कम वळती करण्यापूर्वी ज्या बँकेचा हा धनादेश होता, त्या उत्तर प्रदेशातील बँक व्यवस्थापनाशी आॅनलाईन संपर्क साधला. लगेच तेथून प्रतिसाद न मिळाल्याने स्थानिक बँक अधिकाऱ्यांनी धनादेश वटविण्याची प्रक्रिया थांबवली. दुसऱ्या दिवशी स्थानिक बँक अधिकाऱ्यांना एक ई-मेल मिळाला. त्यातून तो धनादेश वटविण्यास हरकत नसल्याचे कळविण्यात आले होते. मात्र, मोठ्या रकमेच्या व्यवहाराच्या वेळी वापरण्यात येणारी सांकेतिक भाषा नसल्याने त्या मेलबद्दल बँक अधिकाऱ्यांना संशय आला. त्यामुळे नंतर फोनवर संपर्क करण्यात आला. तेव्हा संबंधित बँक प्रशासनाने आपण तसा मेलच पाठविला नाही आणि तो धनादेश आपल्या बँकेचा नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सतीश सिंघानिया यांनी सीताबर्डी पोलिसांशी संपर्क केला. ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी लगेच अश्विन छाबराला ठाण्यात चौकशीसाठी बोलविले. लखनौच्या एका एनजीओला वर्षभर चष्मे पुरविले. त्या बदल्यात आपल्याला ब्रिटो नामक व्यक्तीकडून चेक मिळाल्याचे अश्विनने सांगितले. त्याने ब्रिटोबाबत दिलेल्या माहितीची, संपर्क क्रमांकाची शहानिशा केली असता ती सर्व बनवाबनवी असल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी अश्विनला वेगळ्या पद्धतीने बोलते केले. तेव्हा मात्र अश्विन गडबडला.(प्रतिनिधी) मेलही हॅक केला चष्मे खरेदी विक्रीचा कोणताही व्यवहार झाला नाही. कागदोपत्री व्यवहार दाखवून चेक वटल्यास ३० टक्के कमिशन आपल्याला ब्रिटोने देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे आपण हा धनादेश वटविण्याचा प्रयत्न केल्याची कबुली अश्विनने पोलिसांकडे दिली. स्थानिक अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील बँक व्यवस्थापनाला पाठविलेला ई-मेलही अश्विनच्या साथीदाराने हॅक केल्याचे पुढे आले. त्यामुळे पीएसआय संदीप गवई यांनी शुक्रवारी रात्री अश्विनला अटक केली. शनिवारी कोर्टातून त्याचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला. त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.