निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकºयांचा विषय आला की हल्ली सोशल मीडियावर एक मॅसेज खूप फिरवला जातो. यामध्ये दोन बैलांसह शेतकºयाची प्रतिमा असलेल्या छायाचित्रामध्ये ‘धीर नका सोडू मालक, आपण मिळून आणखी कष्ट करू’, असा तो हळवा करणारा मॅसेज. हा मॅसेज लाईक्स किंवा कमेंटपुरता मर्यादित नाही तर शेतकºयांच्या जीवनातील सध्याचे वास्तव होत आहे. बळीराजा आणि बैलजोडीचे नाते एकेकाळी अतूट होते. मात्र आता हे चित्र बदलले असून स्मार्टवर्कच्या काळात बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. लोप पावणाºया श्रमसंस्कृतीत बैलांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने शेतकºयाच्या जिवलगाची सोबत हरवत चालली आहे.एकेकाळी गावातील प्रत्येक शिवारात अन दारात ढवळ्या-पवळ्याची जोडी असायची. दिवसभर शेतात राबताना बळीराजा त्याच्या बैलांशी बोलायचा आणि आपले दु:ख हलकं करायचा.मात्र आता परिस्थिती बदलली आहे. बैलजोडी पोसायला शेतकºयांजवळ वेळ नाही अन पैसाही नाही. या बैलांच्या श्रमाचे महत्त्वच संपले आहे. शेतीकामात तंत्रज्ञानाला मिळणाºया प्रतिष्ठेमुळे बैलजोडी विकून ट्रॅक्टर घ्यावे लागत आहे. पोळ्याचा सण पूर्वी उत्साहात साजरा व्हायचा. मात्र आता पोळ्याच्या दिवशी सुद्धा सणासारखे वाटत नाही, अशी खंत बळीराजाला वाटत आहे. सततचा दुष्काळ, नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. वर्षभर शेतात राबणाºया बैलांचा एक दिवसाचा सण म्हणून परिस्थितीनुसार कसाही साजरा करायचा, अशीच भावना शेतकºयांची झाली आहे. पोळ्यानिमित्त सजावटीचे सामान खरेदी करायला आलेल्या शेतकºयांना लोकमतने बोलते केले तेव्हा बैलांचे अस्तित्व संकटात आल्याचे जाणवले.शहरालगत असलेल्या धारगावचे सुनील तडस यांच्यानुसार ५५ घरांची वस्ती असलेल्या त्यांच्या गावी ५-६ वर्षापूर्वी ४० बैलजोड्या होत्या. मात्र आज केवळ ७ जोड्या उरल्या आहेत, ज्यामध्ये त्यांच्या दोन जोड्यांचा समावेश आहे. कोराडीचे रमेश भोयर यांनी सांगितले, १० वर्षापूर्वी ४०० च्यावर बैलजोड्या गावात होत्या. मात्र आजच्या घडीला ४० शिल्लक असतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हीच अवस्था ठाणेगाव, ता. कारंजा, जि.वर्धा येथील आहे. येथील चंद्रशेखर बगवे यांच्यानुसार दहा वर्षापूर्वी गावात २५० च्यावर असलेल्या बैलजोड्यांची संख्या आज ७० वर आली आहे. शिवाय बैलजोडीचा महिन्याचा खर्च सात ते आठ हजार रुपये आहे. इथे माणसांनाच जेवण मिळत नाही तर जनावरांना खायला द्यावे काय?अर्थकारणावरही परिणामपूर्वी पेरणीपासून मळणीपर्यंतची सर्व कामे बैलांच्या मदतीने व्हायची. त्यामुळे बैलजोडी असलेल्यांना आर्थिक फायदा व्हायचा. मात्र आज तीच कामे ट्रॅक्टरने केली जातात. धानाचा विचार केल्यास १० एकराचा शेतकरी या कामांवर ५० ते ६० हजार रुपये खर्च करतो. लहान कामे सोडली तर बैलजोड्यांना कामे उरत नाही. त्यामुळे त्यांना मिळणारा पैसा ट्रॅक्टर मालकाला जातो. विशेष म्हणजे हा ट्रॅक्टर मालक शेतकरी असेलच असे नाही.सजावटीचे साहित्यही महागलेपोळ््याचे साहित्य विक्रेता रमेश टेकचंदानी यांच्यानुसार सजावटीच्या साहित्यात २० टक्क्याने वाढ झाली आहे. १०००-१२०० ला मिळणारी झुल २५०० ते ४५०० वर गेली आहे. ४० ला मिळणारी वेसण ७० वर गेली आहे. १२० ला मिळणारे कासरे १७० ते २०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. पूर्वी बैलांचा पूर्ण शृंगार १००० ते १५०० पर्यंत व्हायचा, मात्र आता पाच ते सहा हजार रुपये खर्च करावे लागतात. सध्याच्या परिस्थितीमुळे शेतकरी कमी प्रमाणात साहित्य खरेदी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.बैलजोड्यांच्या किमती आवाक्याबाहेरपूर्वी २०-२५ हजार रुपयांमध्ये बैलजोडी विकत मिळायची. मात्र चाºयाची कमतरता व पशुधन कमी झाल्याने आता बैलांच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. विदर्भात विशेषत: तीन प्रकारच्या जोड्या आढळतात. यामध्ये मुगलाई बैलांची जोडी दीड लाखांशिवाय मिळत नाही. गावरान बैलजोडी एक ते सव्वा लाखाला मिळते व त्याखालोखाल गौळाऊ प्रजातीचे बैल एक लाख रुपयांपर्यंत मिळतात. ही किंमत सामान्य शेतकºयाला परवडण्यासारखी नाही.परिस्थिती कशीही असो, पोळा साजरा करतोचमात्र, ट्रॅक्टरसारख्या यंत्राला जेव्हा काम तेव्हाच इंधन लागत असते. शिवाय कामे झटपट करता येतात, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. सधन शेतकºयांकडे एक ट्रॅक्टर असतोच. गरीब शेतकरी आजही ४०० ते ५०० रुपये भाड्याने बैलजोडी घेतो. अनेकांना तेही परवडत नाही, अशी अवस्था गावोगाव पाहायला मिळते.
सर्जा-राजाची सोबत हरवत चालली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:15 IST
शेतकºयांचा विषय आला की हल्ली सोशल मीडियावर एक मॅसेज खूप फिरवला जातो.
सर्जा-राजाची सोबत हरवत चालली
ठळक मुद्देसातत्याने कमी होत आहे बैलांची संख्या