शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात वृक्षाराेपणासाठी सरसावली बच्चे कंपनी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:06 IST

नागपूर : हिरव्या नारळातील पाणी पिल्यानंतर उरलेली कवटी दुकानदाराला परत करताे किंवा फेकून देताे. असे हिरवे नारळ घरी आणल्यानंतर ...

नागपूर : हिरव्या नारळातील पाणी पिल्यानंतर उरलेली कवटी दुकानदाराला परत करताे किंवा फेकून देताे. असे हिरवे नारळ घरी आणल्यानंतर तर ते हमखास फेकले जाते. मात्र, चिमुकल्या शाळकरी मुलीने या कवटीत राेपटे लागवडीची नवीन कल्पना सुचविली आहे. तिने त्यात जांभळाचे बी लावून राेप वाढविले आहे.

पावसाळा सुरू झाला की नागरिकांमध्ये वृक्षलागवडीची हुरहुर निर्माण हाेते. नर्सरीमधून राेप आणून घराची परसबाग फुलविली जाते. फ्लॅटमध्येही फुलझाडे सजविली जातात. या वैयक्तिक गाेष्टीला सार्वजनिक रूप देण्याचे प्रयत्न शहरातील ग्राेव्हील फाउंडेशनने गेल्या वर्षीपासून सुरू केले आहे. यावेळी शाळकरी मुलांना जाेडण्यात आल्याने नवीन संकल्पनांसह ‘सेल्फी विथ सॅपलिंग’ ही माेहीमच सुरू झाली आहे. याअंतर्गत हडस हायस्कूल व साेमलवार माॅ उमिया ब्रँचच्या २००० च्यावर मुलांनी राेपटे लागवड सुरू केली. या मुलांनी त्यांच्यातील नवनवीन कल्पनांनी बियांचे जतन करून राेपे तयार केली. हडस हायस्कूलच्या विद्यार्थिनीचे नारळाच्या कवटीतील राेप त्याच कल्पनेतून साकार झाले.

ग्राेव्हीलचे डाॅ. अभिक घाेष यांनी सांगितले, आंबे, कडुलिंब व जांभळाच्या निसर्गस्नेही राेपांना प्राधान्य देण्यात आले असून अशा प्रकारे प्रत्येक मुलांकडून ५ ते १० राेपांची निर्मिती करून ५००० वर राेपटे तयार केले आहेत. या राेपट्यांचे लाेकांच्या घरी आणि काही एनजीओंच्या मदतीने सार्वजनिक जागेवर वृक्षाराेपण करण्यात येणार असल्याचे डाॅ. घाेष यांनी स्पष्ट केले. मुलांच्या सहभागाने या माेहिमेला वेगळे रूप आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

वेस्टमधून ट्री-गार्ड

काही मुलांनी घरातील धातूच्या कचऱ्यापासून ट्री-गार्ड तयार करण्याची कल्पना अमलात आणली.

मियावाॅकी वृक्षाराेपण

वेगाने जंगल निर्माण करण्याची ही जपानी टेक्निक आहे. मुलांनी या पद्धतीनेही राेपटे तयार केले व जवळच्या उद्यानात, मैदानात त्यांची लागवड करण्याची संकल्पना मांडली. फाउंडेशनद्वारे जागांची निवड करून ती संकल्पना अमलात आणली जाईल.