संत जगनाडे महाराज यांना मनपातर्फे विनम्र अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजाला कीर्तन -अभंगाच्या माध्यमातून शिकवणी देणारे संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त मंगळवारी मनपा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राला उपमहापौर मनिषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा आणि शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व संताजी नवयुवक मंडळाचे पदाधिकारी बलवंत मोरघडे, आशिष पेटकर, प्रमोद बारई, घनश्याम घोडमारे, नरेन्द्र हटवार, नयना झाडे आदी उपस्थित होते.