शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संजय काशीकर यांची अकाली ‘एक्झिट’

By admin | Updated: April 25, 2017 02:13 IST

सुप्रसिद्ध नाटककार व नेपथ्यकार संजय काशीकर यांचे सोमवारी निधन झाले़ ते ५९ वर्षांचे होते. १० एप्रिल रोजी अपघात झाल्यानंतर त्यांनी तब्बल १४ दिवस मृत्यूशी झुंज दिली़ ....

१४ दिवस दिली मृत्यूशी झुंज : नागपूरच्या रंगभूमीचे मोठे नुकसाननागपूर : सुप्रसिद्ध नाटककार व नेपथ्यकार संजय काशीकर यांचे सोमवारी निधन झाले़ ते ५९ वर्षांचे होते. १० एप्रिल रोजी अपघात झाल्यानंतर त्यांनी तब्बल १४ दिवस मृत्यूशी झुंज दिली़ पण, अखेर या लढाईत मृत्यूच जिंकला़ जीवनाच्या रंगमंचावरून संजय काशीकर यांनी घेतलेल्या या अकाली ‘एक्झिट’मुळे नागपूरच्या रंगभूमीचे मोठे नुकसान झाले आहे़ लेखक, अभिनेते, दिग्दर्शक आणि नेपथ्यकार म्हणून ख्याती असलेले संजय काशीकर १० एप्रिल रोजी दिवसभर कामे आटोपून संध्याकाळच्या सुमारास घराबाहेर पडले़ दरम्यान, खामला चौक येथे त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने, ते डिव्हायडरवर पडले़ त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. स्थानिक नागरिकांनीच त्यांना रुग्णालयात दाखल केले़ येथे अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान सोमवारी अखेर त्यांचे निधन झाले़ सोमवारीच संध्याकाळी त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ यावेळी नाट्यक्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती़ त्यांच्यामागे पत्नी व एक मुलगी आहे़ संजय काशीकर यांच्या अकाली निधनाने नागपूरकर रंगकर्मींना मोठा धक्का बसला आहे़ (प्रतिनिधी)लेखक, अभिनेता, दिग्दर्शक,संगीतकार आणि नेपथ्यकारहीसंजय काशीकर हे चौफेर प्रतिभेचे धनी होते़ १९८२ साली त्यांनी अभिनयाच्या माध्यमातून रंगभूमीवर प्रवेश केला़ ‘सासरेबुवा जपून’, ‘अखंड दहन’, ‘परिक्रमा’, ‘आंधळया खिडक्या’ या नाटकातील त्यांचा अभिनय विशेष गाजला़ १९९५ पर्यंत ते अभिनयाच्या क्षेत्रात होते़ यानंतर त्यांनी नाटकाचे दिग्दर्शन व नेपथ्यरचनेचे कार्य सुरू केले़ उत्कृष्ट दिग्दर्शक आणि नेपथ्यकार म्हणून त्यांनी राज्य शासन, अखिल भारतीय नाट्य परिषदेसह इतरही अनेक प्रतिष्ठित संस्थांचे राज्यस्तरीय पुरस्कार मिळवले़ ‘तो’ पुरस्कार शेवटचा ठरलाअखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचा वर्धापनदिन नुकताच पार पडला़ या कार्यक्रमात संजय काशीकर यांना टावर या नाटकासाठी उत्कृष्ट नेपथ्यकाराचा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा काशीकर यांची मृत्यूशी झुंज सुरूच होती़ सतीश काळबांडे यांनी त्यांच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला़ आपल्या आयुष्यात नाटक प्रत्यक्ष जगणारे व नाटकाच्या दर्जाबाबत कुठलीही तडजोड न स्वीकारणारे संजय काशीकर हे या क्षेत्रातील नवोदितांसाठी मार्गदर्शकाचे काम करीत होते़ त्यांच्या अशा अकाली जाण्याने एका सच्च्या रंगकर्मीसोबतच एक कुशल मार्गदर्शकही हरपला आहे़