शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

झाकीर नाईकबाबत संघाने सोडले मौन

By admin | Updated: July 9, 2016 03:02 IST

दहशतवादाला खतपाणी घातल्याचे आरोप असलेले ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’चे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून टीका करण्यात आली आहे.

भय्याजी जोशींची टीका : गरळ ओकणाऱ्याला विचारणा व्हावीनागपूर : दहशतवादाला खतपाणी घातल्याचे आरोप असलेले ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’चे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून टीका करण्यात आली आहे. गरळ ओकणाऱ्याला विचारणा व्हायला हवी, असे वक्तव्य संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले आहे. नागपुरातील संत रविदास सभागृहात सामाजिक समरसतेसंदर्भात शुक्रवारी त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर प्रसारमाध्यमांजवळ त्यांनी वरील वक्तव्य दिले.झाकीर नाईकबाबत संघाची भूमिका काय आहे, असा प्रश्न त्यांना केला असता संघ सामाजिक समरसता जोपासण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारची गरळ ओकणाऱ्याला विचारणा करायलाच हवी, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांच्यावरदेखील टीका केली. झाकीर नाईकला ज्या दिग्विजयसिंग यांनी ‘मसिहा’ म्हटले आहे, त्यांनी झाकीरसोबतच जावे असे जोशी म्हणाले. ढाका हल्ल्यातील अतिरेक्याने आपल्याला झाकीर नाईकच्या भाषणातून प्रेरणा मिळाल्याचे चौकशीत सांगितले. तेव्हापासून नाईक हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना डॉ. नाईक यांची भाषणे तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)