शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

संदीप जोशींचा प्रहार, ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांचे काम लज्जास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर पडद्यामागे गेलेले उपराजधानीचे माजी महापौर संदीप जोशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर पडद्यामागे गेलेले उपराजधानीचे माजी महापौर संदीप जोशी यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. वंजारीनगर पुलावरून त्यांनी ‘एनएचएआय’च्या (नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया) अधिकाऱ्यांवरच जोरदार प्रहार केला आहे. असा पूल बनविणाऱ्या अधिकाऱ्यांचे काम लज्जास्पद आहे, असे ‘ट्विट’ त्यांनी केले. हे खाते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारित येते. राजकारणात गुरुस्थानी मानणाऱ्या गडकरी यांच्यावरच जोशी यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

वंजारीनगर ते अजनी हा पूल तयार झाला असून, यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे; परंतु पूल जेथे अजनीच्या मार्गाला जोडल्या जातो तेथे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणली. यासंदर्भात जोशी यांनी बुधवारी सकाळी ‘ट्विट’ केले. ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांनी वंजारीनगरचा पूल अतिशय सुंदररीत्या तयार केला आहे, मात्र सोबतच शहरात एक नवे अपघातस्थळदेखील तयार झाले आहे. ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांचे काम लज्जास्पद आहे, असे मत जोशी यांनी ‘ट्विट’च्या माध्यमातून व्यक्त केले. यामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. पदवीधरच्या निवडणुकांत झालेला पराभव जिव्हारी लागला म्हणून जोशी यांनी नाराजीचा सूर काढत अप्रत्यक्षपणे गडकरी यांना ‘टार्गेट’ करणारे ‘ट्विट’ केल्याची राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होती.

पाच तासांनी ‘ट्विट’मध्ये ‘ट्विस्ट’

वंजारीनगरचा पूल हा सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधला आहे. ही बाब जोशी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तब्बल पाच तासांनी नवे ‘ट्विट’ केले. हा पूल ‘एनएचएआय’ नव्हे तर सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधला आहे. त्यामुळे या खात्याच्या अधिकाऱ्यांची लाज वाटते असे त्यात ते म्हणाले. आश्चर्याची बाब म्हणजे जोशी यांनी अगोदरचे ‘ट्विट’ ‘डिलीट’ केले नाही. ते ‘ट्विट’देखील कायम असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

महापौर असूनदेखील विभाग कसा माहिती नाही ?

जोशी हे सव्वा वर्ष नागपूरचे महापौर होते. त्यांच्या कार्यकाळात पुलाचे काम सुरू होते. अगदी काही दिवसांअगोदरच ते पदावरून पायउतार झाले. शिवाय भाजपच्याच सत्ताकाळात या पुलाचे काम सुरू झाले. असे असतानादेखील त्यांना शहराच्या हृद्यस्थळी असलेला पूल नेमका कोणता विभाग बांधतो आहे हे माहिती नव्हते ही बाब कोड्यात टाकणारी आहे. जोशी हे विभागासंदर्भात खरोखच अनभिज्ञ होते की राजकीय ‘चूक’ झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी नवीन ‘ट्विट’ केले, हा प्रश्न उपस्थित होत आहे.