शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

संदीप जाधव यांनी स्वीकारला स्थायी समिती अध्यक्षपदाचा पदभार

By admin | Updated: March 11, 2017 16:31 IST

महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 11 - महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसली तरी ती सुधारण्याची ताकद पदाधिका-यांत आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत शोधण्यात येतील. सोबतच कर वसुलीसाठी कठोर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप जाधव यांनी शनिवारी दिली.  मावळते अध्यक्ष बंडू राऊत यांच्याकडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे शहराचा विकास होत आहे. शहरातील अनधिकृत ले-आऊट नियमित करण्याच्या निर्णयासोबतच अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. पण, असे असले तरी महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील.  शहरात  सुमारे 6 लाख मालमत्ता आहेत. परंतु सर्व मालमत्तावर कर आकारणी होत नाही. यासाठी सर्व्हेक्षण करुन नव्याने कर आकारणी करावी लागेल.
 
मालमत्ता कर, पाणीपपट्टी व नगररचना विभागाच्या वसुलीवर अधिक भर दिला जाईल. मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करुन कठोर कारवाई करु, असा इशारा जाधव  यांनी दिला. उत्पन्नात वाढ जाली तर नगरसेवकांना विकास कामांसाठी अधिक निधी उपलब्ध करता येईल. 
 
महापालिकेच्या सर्व झोनचा दौरा करून कर वसुलीचे दिलेले उद्दिष्ट व प्रत्यक्षात झालेली वसुली याचा आढावा घेण्यात येईल. महापालिका आयुक्त लवकरच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यानंतर सर्व पदाधिकारी व नगरसेवकांशी चर्चा करून स्थायी समिती २०१७-१८ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली. 
आश्वासनांची पूर्तता करू
भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात शहर विकासाचे आश्वासन दिले आहे. याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. वर्षभरात नागरिकांना याचा प्रत्यय येईल.  लोकांनी दर्शवलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही. अशी ग्वाही जाधव यांनी प्रश्नाच्या उत्तरात  दिली.