शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

एफडीएने घेतले ‘त्या’ इंजेक्शनचे नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:07 IST

नागपूर : म्युकरमायकोसिसवर (काळी बुरशी) प्रभावी असलेले ‘अ‍ॅम्पोटेरीसीन बी’चा ‘लिपीड कॉम्प्लेक्स’ या इंजेक्शनमुळे मेडिकल, मेयोमधील रुग्णांना ‘रिअ‍ॅक्शन’ आल्याचे वृत्त ...

नागपूर : म्युकरमायकोसिसवर (काळी बुरशी) प्रभावी असलेले ‘अ‍ॅम्पोटेरीसीन बी’चा ‘लिपीड कॉम्प्लेक्स’ या इंजेक्शनमुळे मेडिकल, मेयोमधील रुग्णांना ‘रिअ‍ॅक्शन’ आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने सोमवारी मेडिकलला भेट देत बंदी आणण्यात आलेल्या इंजेक्शनचे नमुने ताब्यात घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविले. एकट्या मेडिकलमध्ये संबंधित बॅचचे २,५०० वर इंजेक्शन असल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, १९ जून रोजी ‘आय ०२१००५’ या बॅच क्रमांकाचे ‘अ‍ॅम्पोटेरीसीन बी लिपीड कॉम्प्लेक्स’ इंजेक्शनचा जवळपास दीड हजारांवर साठा आरोग्य विभागाकडून मेडिकलला उपलब्ध झाला. म्युकरमायकोसिसच्या सुमारे ७७ रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात आले. काही वेळानंतर बहुसंख्य रुग्णांना थंडी वाजून ताप व मळमळ वाटायला लागले. अकोला मेडिकलमध्येही याच बॅचच्या इंजेक्शनमुळे रुग्णांमध्येही हीच लक्षणे दिसून आल्याने त्यांनी २५ जून रोजी या इंजेक्शनचा वापरावर बंदी आणली. यामुळे मेडिकल प्रशासनानेही संबंधित बॅचचे इंजेक्शन न वापरण्याचा सूचना केल्या. २५ जून रोजी याच इंजेक्शनचा ‘बॅच क्र. एलबीडी १४८’च्या इंजेक्शनमधूनही रुग्णांना लक्षणे दिसून आली. यामुळे २६ जून रोजी मेडिकल प्रशासनानेही यावर बंदी आणली. याच बॅचचे इंजेक्शन औरंगाबाद मेडिकलमध्ये असल्याने त्यांनीही न वापरण्याचा सूचना दिल्या. ‘लोकमत’ने हे वृत्त सोमवारी प्रकाशित करताच, ‘एफडीए’ने मेडिकलला भेट दिली. एफडीएचे सहायक आयुक्त (औषधी) पुष्पहास बल्लाळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले, दोष आढळून आलेल्या बॅचमधील इंजेक्शनचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल.