शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सखी महोत्सव २७ रोजी

By admin | Updated: April 25, 2017 02:21 IST

लोकमत सखी मंच स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले एक असे व्यासपीठ ज्या व्यासपीठावरून आज ती मुक्तपणे बागडू लागली आहे.

विविध स्पर्धांची धूम : लोकमत सखी मंच व भोजवानी फूडस् यांचे संयुक्त आयोजन, सोबत इन्शुरन्सविषयी मार्गदर्शननागपूर : लोकमत सखी मंच स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले एक असे व्यासपीठ ज्या व्यासपीठावरून आज ती मुक्तपणे बागडू लागली आहे. आत्मविश्वासाच्या पंखावर कर्तव्याचे ओझे सांभाळत मुक्तपणे झेप घेऊ लागली आहे. या व्यासपीठावरून फक्त शहर विभागातील महिलाच नाही तर ग्रामीण भागातील महिलासुद्धा गगनभरारी घेऊ लागल्या आहेत. त्यांच्यातील कलेला, प्रतिभेला वाव देण्यासाठी पुन्हा एकदा जिल्हास्तरीय ‘सखी महोत्सव-२०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. कलाविष्काराचा हा अभूतपूर्व सोहळा ठरणार आहे.लोकमत सखी मंच व भोजवानी फूडस् आयोजित ‘बिर्ला सनलाईफ इन्शुरन्स सखी महोत्सव-२०१७’ म्हणजे विविध स्पर्धांनी नटलेला उत्सव. यात एकल नृत्य स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा आणि समूह नृत्य स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यकम सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात २७ एप्रिल रोजी ११ ते ३ यादरम्यान आयोजित केला आहे. या कार्यक्रमात सखींच्या कलाविष्काराच्या मुक्त उधळणासोबतच विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मिळणार आहे. केवळ मनोरंजनावरच भर देण्यात आला नसून, स्त्रियांचे आर्थिक नियोजनदेखील व्यवस्थितरीत्या व्हावे यासाठी खासकरून महिलांसाठी बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सच्यावतीने ‘स्वाभिमान’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. त्यात कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त कसे मिळवावे, यासंदर्भात बिर्ला सनलाईट इन्शुरन्सचे प्रतिनिधी मार्गदर्शन करतील. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून उपस्थित राहणाऱ्या महिलांसाठी खास भाग्यवंत सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये आकर्षक पुरस्कार जिंकण्याची संधी मिळणार आहे.दरम्यान, आज सोमवारी या महोत्सवाची प्राथमिक फेरी लोकमत भवनाच्या ११ व्या माळ्यावर पार पडली. परीक्षक म्हणून डेनिस पास्कल व प्रियल शहा उपस्थित होते. या महोत्सवाला ‘अ‍ॅटिट्यूड डिझाईन्स बाय दिशा’याचे विशेष सहकार्य मिळाले आहे. या आगळ्यावेगळ्या सखी महोत्सवात सर्व सखी मंच सदस्य परिवरासहित सादर आमंत्रित आहे. अधिक माहितीसाठी नेहा जोशी यांना ९८५०३०४०३७ वर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)वैशाली सामंत यांच्या गीतांचा कार्यक्रम‘कोंबडी पळाली’ फेम वैशाली सामंत यांच्या या गीताने साऱ्या जगाला वेड लावले. सखी महोत्सवात अशा अनेक धडाकेबाज गीतांची प्रस्तुती त्या करणार आहेत. तसेच सखींशी दिलखुलास गप्पा मारणार आहेत. याशिवाय या कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुका सखी मंच सदस्य सहभागी होणार असून, त्यांचा कलाविष्कार रसिकांना बघायला मिळणार आहे.