शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

मदतीसाठी धावले ‘लोकमत’

By admin | Updated: August 14, 2015 03:22 IST

नागरिकांच्या मदतीला ‘लोकमत’चे पत्रकार योगेश पांडे व छायाचित्रकार विशाल महाकाळकर धावून गेले व पाण्यात अडकलेल्या सुमारे १२ ते १५ जणांना सुखरुपपणे बाहेर काढले.

नागपूर : धो धो कोसळणारा पाऊस, रस्त्यावर कंबरेपर्यंत साचलेले पाणी आणि त्यातच सहजपणे उभेदेखील राहू न देणारा पाण्याचा जोरदार प्रवाह. नेमका अंदाज न आल्याने अनेक नागरिक पाण्यातून रस्ता ओलांडायला गेले अन् अडकून बसले. मदतीची हाक ऐकण्यासाठी ना पोलीस ना प्रशासन. अशा स्थितीत नागरिकांच्या मदतीला ‘लोकमत’चे पत्रकार योगेश पांडे व छायाचित्रकार विशाल महाकाळकर धावून गेले व पाण्यात अडकलेल्या सुमारे १२ ते १५ जणांना सुखरुपपणे बाहेर काढले. सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला असल्याने ‘लोकमत’ची चमू वार्तांकनासाठी बाहेर पडली होती. झाशी राणी चौक, मुंजे चौक तसेच मोरभवनसमोरील भागात कंबरभर पाणी साचले होते. शिवाय नागनदीचे पाणी पातळी सोडून रस्त्यांवरून वाहत होते. त्यामुळे झाशी राणी चौकाकडून मुंजे चौकाकडे पाण्याचा जोरदार प्रवाह येत होता व यामुळे एकमेकांची मदत घेतल्याशिवाय नागरिकांना चालता येणे शक्य नव्हते. अशा स्थितीत झाशी राणी चौकातच दोन जेष्ठ नागरिक पाण्यात अडकले होते. पाण्याच्या प्रवाहामुळे पाऊल टाकण्याचीदेखील त्यांची हिंमत होत नव्हती व क्षणाक्षणाला पाणी वाढत होते. ‘लोकमत’ चमूने तत्काळ त्यांच्याकडे धाव घेतली व त्यांना पाण्यातून बाहेर काढले. यानंतर मुंजे चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर एका तरुणीला पाण्याचा अंदाज आला नाही व ती पडली. नाका-तोंडात गेलेले पाणी व पाण्याचा प्रवाह यामुळे ती घाबरून गेली होती व उठण्यासाठी तिची धडपड सुरू होती. ‘लोकमत’ चमूने त्या मुलीलादेखील पाण्यातून बाहेर काढले व सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. याशिवाय जवळील ‘मॉल’मध्ये अडकलेल्या काही महिला कर्मचारी, कामठीकडे निघालेले शाळकरी विद्यार्थी व एका मूकबधिर तरुणालादेखील अशाच पद्धतीने मदतीचा हात देण्यात आला. यानंतर इतर नागरिकांनीदेखील मदतीचा हात देण्यास सुरुवात केली.(प्रतिनिधी)संभाव्य धोका टाळलाझाशी राणी चौकाजवळील एका विद्युत ‘डीपी’पर्यंत पाणी भरत आले होते. या ‘डीपी’मध्ये वीजप्रवाह सुरू असल्याची माहिती स्थानिक दुकानदारांनी दिली. ‘लोकमत’ चमूने पुढाकार घेत नागरिकांना तेथील धोक्याबाबत सूचना देण्यास सुरुवात केली व विद्युत मंडळाला याची माहिती देऊन संभाव्य धोका टाळला.