शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दारू अड्ड्यांवर नागपूर ग्रामीण पाेलिसांच्या धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:08 IST

काटाेल/सावनेर/माैदा/बुटीबाेरी : लाॅकडाऊन काळात अवैध दारू विक्रीला उधाण येत असल्याने स्थानिक गुन्हे शाखा आणि नागपूर ग्रामीण पाेलिसांच्या पथकाने काटाेल, ...

काटाेल/सावनेर/माैदा/बुटीबाेरी : लाॅकडाऊन काळात अवैध दारू विक्रीला उधाण येत असल्याने स्थानिक गुन्हे शाखा आणि नागपूर ग्रामीण पाेलिसांच्या पथकाने काटाेल, सावनेर तालुक्यातील खापा व केळवद, माैदा व नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू विक्री अड्डे व वाहतुकीवर कारवाई करीत नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यात आराेपींकडून देशी, विदेशी व माेहफुलाची दारू, दाेन चारचाकी व एक दुचाकी वाहन असा एकूण ८ लाख ५३ हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

काटाेल पाेलिसांनी शहरातील संगमानगरात कारवाई करीत माेहफुलाची अवैध वाहतूक करणारी एमएच-३१/सीएस-८३५९ क्रमांकाची झायलाे पकडली. यात महेंद्र प्रीतम राजपूत, रा. डाेंगरगाव, ता. काटाेल याच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला. त्याच्याकडून दाेन लाख रुपयाची झायलाे आणि दाेन हजार रुपयाची माेहफुलाची २० लिटर दारू असा एकूण २ लाख २ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार महादेव आचरेकर यांनी दिली.

खापा (ता. सावनेर) पाेलिसांनी खापा शहरातील नवीन वस्तीत राहणाऱ्या सुनील चतरू काेल्हेच्या घरी धाड टाकून घराची झडती घेतली. यात त्याच्या घरातून १,२६० रुपये किमतीची देशीदारू (२१ बाटल्या) जप्त करून त्याच्याविराेधात गुन्हा नाेंदविण्यात आल्याची माहिती ठाणेदार अजय मानकर यांनी दिली. बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) पाेलिसांनी खापरी (ता. नागपूर ग्रामीण) शिवारात कारवाई करीत माेहफुलाच्या दारूची अवैध विक्री करणाऱ्या अरविंद राजू ॲलाेसिस, रा. बाेरी (ठाणा) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाच हजार रुपयाची २५ लिटर माेहफुलाची दारू जप्त केली.

बुटीबाेरी पाेलिसांनी दुसऱ्या कारवाईमध्ये महेश गजानन गाेंडगे, रा. वाॅर्ड क्रमांक-५, बाेरी याच्या घरी धाड टाकली. यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्याच्याकडून सहा हजार रुपयाची ३० लिटर माेहफुलाची दारू जप्त केली. याच पाेलिसांच्या पथकाने राजू माेतीराम जाकनकर, रा. रुईखैरी याच्या घरी धाड टाकून दाेन हजार रुपयाची १० लिटर माेहफुलाची दारू जप्त केली व त्याच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविला. नंतर या पथकाने खापरी (डवा) परिसरात कारवाई करीत माेहफुलाच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या शुभम विलास दाेडके याच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविला. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची एमएच-४०/बीझेड-७३६० क्रमांकाची दुचाकी व चार हजार रुपयाची २०० लिटर माेहफुलाची दारू असा एकूण ५४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली.

...

गुमथळा परिसरात ‘एलसीबी’ची कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमथळा (ता. कामठी) शिवारात कारवाई करीत रामेश्वर गाेविंदराव शहाणे, रा. घाेरपड, ता. कामठी याच्याकडून २४ हजार ९६० रुपये किमतीची देशीदारूच्या ४८० बाटल्या आणि ११ हजार २२० रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या ७५ बाटल्या असा एकूण ३६ हजार १८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.

...

बाेलेराेमधून माेहफुलाची वाहतूक

केळवद (ता. सावनेर) पाेलिसांनी सावळी (फाटा) परिसरात केलेल्या कारवाईमध्ये माेहफुलाची अवैध वाहतूक करणारे एमएच-४०/एके-००४० क्रमांकाचे छाेटे मालवाहू वाहन (बाेलेराे) पकडले. यात संताेष गणपत बावनकर, विजय गणेश मेश्राम दाेघेही रा. धापेवाडा, ता. कळमेश्वर व शिवशंकर नारायण माेहाडीकर, रा. चंद्रभागानगर, तांडापेठ, नागपूर यांच्याविराेधात गुन्हा नाेंदविला. शिवाय, त्यांच्याकडून पाच लाख रुपयाचे वाहन आणि ६० हजार रुपयाची १,२०० किलाे माेहफुले असा एकूण ५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी दिली.