शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते ठरताहेत जीवघेणे

By admin | Updated: September 2, 2016 02:48 IST

गेल्या दोन दिवसात शहरातील रस्ते अपघातात महिला व प्रसिद्ध डॉक्टरसह पाच जणांचे बळी गेले.

दोन दिवसांत पाच जणांचे बळी : जड वाहनांवर हवे नियंत्रणनागपूर : गेल्या दोन दिवसात शहरातील रस्ते अपघातात महिला व प्रसिद्ध डॉक्टरसह पाच जणांचे बळी गेले. यामुळे वाहनधारकात भीतीचे वातावरण आहे. जड वाहनांची वाढलेली वर्दळ व वाहतूक नियमांचे होणारे सर्रास उल्लंघन ही अपघातांची कारणे असली तरी सर्वाधिक अपघात रस्त्यांमुळे होत आहेत. शहरातील रस्ते जीवघेणे ठरत असल्याचे चित्र आहे.पावसाळ्याला सुरुवात होताच शहरातील रस्ते उखडतात. रस्त्यावर पसरलेली गिट्टी व खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात वाहने स्लीप होऊ न अनेकदा अपघात घडतात. सोबतच शहरात मोठ्याप्रमाणात सुरू असलेल्या विकास कामांमुळे जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. रिंगरोड सोबतच अंतर्गत रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक जीवघेणी ठरत आहे. याला आळा घालण्यासाठी शहरात वर्दळीच्या कालावधीत जडवाहनांना प्रवेश बंदी करण्याची आवश्यकता आहे. जड वाहनांना प्रामुख्याने रात्रीच्यावेळी शहरात प्रवेश द्यावा. वाहनधारकांकडून वाहतूक सिग्नल तोडण्याचे प्रकार वाढले आहेत. झ्रेब्रा क्रॉसिंगचा वापर केला जात नाही. भरधाव गाडी चालविणे. अशा कारणांमुळे अपघातात भर पडत आहेत. तसेच अपघातात बळी ठरलेल्यापैकी किती जणांनी हेल्मेट घातले होते. हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. झेब्रा क्रॉसिंग व पट्ट्यांचा अभावनागपूर : चौकातील सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग व पट्टे असायलाच हवे. परंतु शहरातील वर्दळीच्या सिग्नलवर याकडे दुर्लक्ष आहे. अपघात झालेल्या मानेवाडा व ओमनगर चौकातील सिग्नलवर झेब्रा क्र ॉसिंग व पिवळे पट्टे नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिक थांबण्याची रेषा ओलांडून वाहन थांबवितात. यामुळे अनेकदा अपघात होतात. शताब्दीनगर, मानेवाडा चौक यासारख्या ठिकाणी तर हमखास असे प्रकार घडताना दिसून येतात.सुरक्षेसाठी हेल्मेट आवश्यकगेल्या काही दिवसात अपघातातील बळींचा विचार करता यातील किती जणांनी हेल्मेट घातले होते याचाही विचार करण्याची गरज आहे. वाहनचालकांनी स्वत: विषयी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वाहन चालकांनी नियमांचे पालन करण्यासोबतच हेल्मेट घालणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)