शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

किडनी प्रत्यारोपणासाठी आरएमओ उधारीवर

By admin | Updated: February 24, 2016 03:16 IST

किडनी प्रत्यारोपण केंद्र चालविण्यासाठी बधिरीकरण (अ‍ॅनेस्थेशिया), औषध वैद्यक (मेडिसीन) व शल्यक्रिया विभागाच्या ...

सुपर स्पेशालिटी रुग्णालय : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३९१ पदे रिक्तनागपूर : किडनी प्रत्यारोपण केंद्र चालविण्यासाठी बधिरीकरण (अ‍ॅनेस्थेशिया), औषध वैद्यक (मेडिसीन) व शल्यक्रिया विभागाच्या (सर्जरी) एक वर्षांचा अनुभव असलेल्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याची (आरएमओ) गरज असते. तज्ज्ञाच्या मते, या सर्व विभागाचे प्रत्येकी तीन-तीन आरएमओ मिळाले तर प्रत्यारोपणला मदत होऊन उपचारात गती येऊ शकते. परंतु राज्यातील पहिले किडनी प्रत्यारोपण शासकीय रुग्णालय असलेल्या सुपर स्पेशालिटीमध्ये होऊनही वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालकाने (डीएमईआर) अद्यापही आरएमओची पदे भरलेली नाही. यामुळे येत्या सोमवारी होणाऱ्या प्रत्यारोपणासाठी मेडिकलकडून पुन्हा उधारीवर आरएमओ मागितले जाणार आहे. रुग्णालयाचा ‘कणा’ असलेल्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा सुपर स्पेशालिटीमध्ये भरलेल्याच नाहीत. यामुळे रुग्ण सेवांचा बोजवारा उडाला आहे. या हॉस्पिटल्समध्ये आरएमओंची सुमारे ३९१ पदे रिक्त आहेत. हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टर निघून गेल्यानंतर रुग्णाची जबाबदारी परिचारिकांवर येते. येत्या सोमवारी होणाऱ्या दुसऱ्या किडनी प्रत्यारोपणामुळे निवासी डॉक्टरांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.‘सुपर’मध्ये हृदय शल्यचिकित्साशास्त्र, हृदयरोग, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, नेफ्रोलॉजी, यूरोसर्जरी या सात विभागातून रुग्णसेवा दिली जात आहे. गेल्या दोन वर्षात २५ हजार ९७६ रुग्णाची वाढ झाली आहे. तसेच आंतररुग्णांतही वाढ झाली आहे. २०१२ मध्ये ५ हजार ५१२ रुग्ण भरती होते. गेल्या वर्षी १ हजार ५५१ रुग्णांची वाढ होऊन ही संख्या ७ हजार ६३ वर गेली आहे. रुग्णालयात रोज १५ वर अ‍ॅन्जिओग्राफी, ५ वर अ‍ॅन्जिओप्लास्टी, दोन हृदयशल्यक्रियासह दोन न्यूरो सर्जरी होतात. या शिवाय बहुसंख्य वॉर्डाच्या खाटा गंभीर रुग्णाने फुल्ल असतात. यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी २४ तास डॉक्टरांची गरज असते. परंतु सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेनंतर डॉक्टरच राहत नसल्याने अनेकवेळा रुग्णाच्या जीवावर बेतते. अशी बिकट स्थिती असतानाही शासनाचे याकडे लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)